चाकूने भोसकून युवकाचा खून
सिन्नर फाटा येथील घटना
चालत्या ट्रेन मधून संशयित ताब्यात
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात सोमवारी (दि.5) सायंकाळच्या दरम्यान किरकोळ कारणाच्या वादातून युवकाचा चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक चार च्या बाहेर सिन्नर फाटा येथे ही घटना घडली.या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.अजय काळे (रा. गंगापूर, जि. संभाजीनगर )
असे हत्या झालेल्या व्यक्तीचे युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार च्या बाहेर फुगे विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत व दगडफेकीत झाले.त्यानंतर संशयित आरोपी आदित्य नागेश शिंदे याने व त्याच्या सोबत नातेवाईकांनी अजय काळे (वय 21)या युवकावर चाकूने वार केले. वार वर्मी लागल्याने उपचार घेताना तो मयत झाला.या घटनेनंतर संशयित आरोपीनी शकील उदास भोसले याच्यावर हल्ला केला, त्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्यावर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान सदरची घटना समजतात नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके व गुन्हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलीस दाखल होताच पळापळ झाली.त्यातील आदित्य नागेश शिंदे याने भुसावळ कडे जाणाऱ्या चालत्या रेल्वे गाडीत बसून पलायन करण्याच्या तयारीत असतांना नाशिकरोड गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत चालत्या ट्रेन मध्ये उड्या घेतल्या. बोगी मध्ये पळत असतांना मोठ्या शिताफीने आदित्य यास ताब्यात घेतले. मयत अजय काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…