दिंडोरी : प्रतिनिधी
रुमसमोर लघुशंका केल्याचा जाब विचारत असताना दोघांमध्येे झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात दिंडोरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोईराकुमार रामप्रवेश रिकीयासन (29, रा. सुलपुरा, पो. दुग्गल, बिहार) हल्ली रा. अक्राळे एमआयडीसी. यास राजकुमार बैजनाथ बियार, रा. सिकणी, पो. बंका, ता. पदुआ, जि. गढवाल, राज्य झारखंड) हा म्हणाला की. तू रुमसमोर लघुशंका करतो या कारणावरुन कुरापत काढून हातातील धारधार चाकूने सोईराकुमार याच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार करुन जखमी केले.
हे भांडण योगेश विश्वेश्वर रीकीयासन (रा. बिहार) हा सोडविण्यासाठी गेला असता राजकुमार याने योगेशवरही वार केले. त्यात योगेशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कळवण उपविभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक पी. बी. कावळे, अमोल पवार व ढोकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान संशयित राजकुमार यास अटक करण्यात आली असून खुनात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…