नरेडकोचे २२ डिसेंबरपासून नाशकात भव्य होमथॉन प्रदर्शन

जागेचे भूमिपूजन : स्वप्नातील घर घेण्याची लोकांना सुवर्ण संधी
नाशिक: प्रतिनिधी

सर्वसामान्यांच्या स्वप्नातील व वाजवीदराच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे ४ दिवसांचे होमथॉन प्रदर्शन गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून डोम उभारणीच्या कामाचे भूमिपूजन प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून झाले.

आपल्या स्वप्नातील घर व्हावे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे एकप्रकारची पर्वणीच असून नाशिक, मुंबईसह नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व ती खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे त्यांना उपलब्ध होईल,अशी माहिती नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड आणि समन्वयाक जयेश ठक्कर यांनी दिली.

हे प्रदर्शन ४ डोममध्ये उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून त्यात १०० हून अधिक स्टॉल्स असतील. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साहित्ये यांये स्टॉल्सही येथे असतील कोणत्याही स्टोल वर घर बुक करणाऱ्यास लगेचच Naredco तर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे.तसेच प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांचीही नरेडको तर्फे लकी ड्रॉद्वारे एकास भेट मिळणार असल्याचेही तातेड आणि ठक्कर यांनी सांगितले.सह प्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो,केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भूमिपूजनप्रसंगी नरेडकोच्या नाशिक चे सचिव सुनील गवादे,सह समन्वयक शंतनू देशपांडे,राजन दर्यानी,मयूर कपाटे,श्रीहर्ष घुगे,अश्विन आव्हाड, युनियन बॅंकचे सहाय्यक महाव्यवस्थापक परमजीत सिंग, वास्तुविशारद संजय म्हाळस,भूषण राणे,कुलदीप चावरे,नंदन दीक्षित,भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे,प्रशांत पाटील,ऍड. पी.आर गीते,देवेंद्र अहिरे,भूषण महाजन,राजेंद्र बागड,नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago