विधान परिषद : दुपारपर्यंत निकाल
नाशिक : प्रतिनिधी
राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी (दि. 22) जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी मुदतीत माघार न घेतल्याने त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम होते. त्यातच त्यांनी प्रचार थांबविला मात्र, पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीसाठी 18 जून रोजी झालेल्या मतदानात तब्बल 99.84 टक्के मतदान झाले. एकूण 619 मतदारांपैकी 618 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून त्यासाठी चार टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर तहसीलदार व नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतपेट्या उघडल्यानंतर मतपत्रिकांची बंडले तयार करून टेबलनिहाय वाटप केले जाणार आहे.
एकूण 618 वैध मतदारांच्या आधारे विजयासाठी 310 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल. पहिल्याच फेरीत कोणत्याही उमेदवाराला आवश्यक कोटा मिळाला नाही तर दुसर्या पसंतीच्या मतांची गणना करण्यात येईल. निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात असल्याने प्राधान्यक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अपात्र मते वगळून अंतिम निकाल निश्चित केला जाईल. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराडे की गिते यापैकी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष वेधले गेले आहे.
Narendra Darade or Gokul Gite? Verdict today.
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik