दि. 21 ते 27 जून 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : धनचिंता सतावतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. धनचिंता सतावतील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विसंबून काम करू नये. शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत सावध भूमिका घ्यावी. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवा. प्रकृती सांभाळा.
वृषभ : जोरदार आगेकूच
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांनी कुणावर विसंबू नये. फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांनी जोरदार आगेकूच होईल. मनावर संयम ठेवा. वाद, भांडणे टाळा. आरोग्य जपा.
मिथुन : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांची कामासाठी धावपळ होईल. व्यापारी, व्यावसायिकांना मोठा धनलाभ होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. शेअरमध्ये लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क : पगारवाढ होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांच्या योजनांना गती मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. पैशांचे व्यवहार सावधपणे करा. प्रकृती जपा.
सिंह : आर्थिक दिलासा
या सप्ताहात रवी, मंगळ अनुकूल आहे. बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आथिर्र्क दिलासा मिळेल. अनपेक्षितपणे अडकलेले पैसे मिळतील. धनचिंतांना उतार पडेल. खर्च वाढतील. नोकरदारांनी अकारण वाद निर्माण करणे टाळावे. मानसिक अस्वास्थ्य प्राप्त होईल. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे चुकतील. आरोग्य प्रश्नांकहे अजिबात दुर्लक्ष करू नये. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे लांबणीवर टाकणे लाभदायी ठरेल.
कन्या : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना अडचणी सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांना मोठा नफा होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे अनुकूलरीत्या पूर्ण होतील. शेअरमध्ये लाभ होतील. मंगलवार्ता कळतील. प्रेमीजनांना दिलासा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
तूळ : प्रवास टाळा
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. मंगळ, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांनी कुणावर विश्वास टाकू नये. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नये. प्रकृती सांभाळा. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा.
वृश्चिक : भाग्योदय होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांना अडचणी त्रस्त करतील. व्यापारी, व्यावसायिकांचा भाग्योदय होईल. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. शेअरमध्ये लाभ होतील. मनावर ताबा ठेवा. संयम पाळा. कौटुंबिक वादविवाद टाळा. आरोग्य जपा.
धनु : सावध राहा
या सप्ताहात राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी वाढतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहणे आवश्यक ठरेल. प्रकृती जपा.
मकर : इच्छा पूर्ण होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. वास्तू खरेदीचे योग येतील. प्रकृती सांभाळा.
कुंभ : समीकरणे जुळतील
या सप्ताहात रवी, बुध, अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहे. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना वादविवाद, संघातील तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांची समीकरणे जुळतील. राहत्या घराबाबत वाद निर्माण होतील. आरोग्य चांगले राहील.
मीन : खर्च वाढतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील.
विरोधकांच्या कारवाया त्रस्त करतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik