उत्तर महाराष्ट्र

नशा ही नशा, करी जीवनाची दुर्दशा!

अल्पवयीन मुले, तरुणाई व्यसनांच्या विळख्यात

नाशिक ः  देवयानी सोनार

कोवळ्या न कळत्या वयात मुले व्यसने करताना सर्रास दिसून येतात. गुटखा, तंबाखू, सिगारेट, कुत्ता गोळी, इंजेक्शन, स्टेरॉइड, ड्रग्ज, हुक्का आदींचे फॅड वाढले असून, कोवळ्या वयात स्टेरॉइड घेणे वा इतर व्यसने करणे महागात पडू शकते. असे माहीत असूनही उमलत्या वयात शरीराला नशेच्या विळख्यात अडकणे आपल्यासह मित्रमैत्रिणींना मध्यमवयीन असल्यास सहकार्‍यांनाही उद्युक्त करण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोल्हापूर येथे अग्निवीर भरतीत मुलांनी स्ट्रेरॉइड वापरल्याचे तेथील स्वच्छतागृहात इंजेक्शन सापडल्याने खळबळ उडाली. नुकत्याच केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणात दहा ते 17 वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याची माहिती सर्वेाच्च न्यायालयास दिली.
सर्वेक्षणातील आकडेवारीचा संदर्भ घेऊन केंद्राने भारतीयांकडे उत्तेजना व नशेसाठी अल्कोहोल हा सर्वाधिक वापरला जाणारा घटक आणि त्या खालोखाल गांजा, भांग, अङ्गूची नशा करतात. 16 कोटी नागरिक मद्याद्वारे तर पाच कोटी सात लाखांहून अधिक व्यक्ती अल्कोहोलच्या आहारी गेले आहेत. तीन केाटी एक लाख व्यक्ती गांजा किंवा त्यापासून बनवलेले अमली पदार्थांचे सेवन करतात. यामुळे झालेल्या आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. व्यसन म्हणजे आजार असून, तो दूर करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात जाणे आजही नागरिकांच्या पचनी पडत नाही.

नाही उरला धाक
मुले जशी वयात यायला लागतात तसे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून ते स्वतःला बघायला लागतात. आई-वडिलांचा धाक त्यांना नको असतो. त्यातूनच व्यसन करायला लागतात. त्यात संगतीचाही परिणाम असतो.

व्यसनमुक्ती केंद्रांची वानवा
व्यसन हा एक आजार आहे. ही मानसिकताच अजून समाजात फारशी रुजलेली नाही. दारूचे व्यसन बाबा, बुवांकडून किंवा जाहिराती पाहून व्यसनमुक्ती केंद्रांत जाऊन व्यसनापासून सुटका करून घेण्याचा काहींचा प्रयत्न असतो.मात्र, जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या तोकडी आहे. आणि असली तरी जनजागृतीचा अभाव दिसतो.
मनुष्यबळाची कमतरता
व्यसनमुक्ती केंद्र कमी आहेत. निश्‍चितपणे त्यांची संख्या वाढायला हवी. परंतु व्यसन हा एक आजार आहे हे बघण्याचे दृष्टिकोन नाही. समाजामध्ये त्यासाठी लागणार्‍या प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. जास्त केंद्र झाले अशा ठिकाणी नुसतेच जेलसारखे रुग्णाला बांधून ठेवले जाते. त्याचा काही उपयोग होत नाही. कारण ते परत घरी गेल्यानंतर पुन्हा व्यसन सुरू करू शकतात.

समाजात व्यसन हा एक आजार आहे. मानसिक आजाराबद्दल जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक कसं उपलब्ध करून देता येईल याकडे खासगी संस्था आणि सरकार यांनी बघितलं पाहिजे तर त्याचा फायदा अधिक चांगला होऊ शकेल आणि याविषयी जनजागृती तरुण मुलांपासून सुरू करून शाळांपासून किंबहुना सुरू करणे महत्त्वाचे आहे.
– डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ

 

Bhagwat Udavant

Recent Posts

घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, नंतर बायको- सासूलाही पेटवले

  घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही...     नाशिक: …

15 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

  काँग्रेस  मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…

18 hours ago

अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…

18 hours ago

नाशकातील शिवसैनिक जागेवरच : खा.संजय राऊत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…

18 hours ago

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…

18 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…

18 hours ago