नाशिक

नाशिककरांची पसंती गिधाडालाच

1,995 मतांसह ठरले शहराचे पक्षी मानचिन्ह

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराचे पक्षी मानचिन्ह निवडण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडप्रक्रियेत नाशिककरांनी सर्वाधिक 1,995 मते देत गिधाड या पक्ष्याची निवड केली आहे. या प्रक्रियेत कावळा या पक्ष्याला 1,037 मते मिळाली. नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 19) या निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी प्रत्यक्ष निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणार्‍या विविध संस्थांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. यामध्ये गिधाड संवर्धनासाठी कार्य करणारे खोरीपाडा येथील शंकर बाबा शिंदे व यशवंत किसन निंबारे, रेस्क्यू नाशिक डिव्हिजन, सह्याद्री देवराई – गोपालकृष्ण (मोहाडी), ईशा फाउंडेशन (कॉन्शस प्लॅनेट), ग्रीन रिव्होल्यूशन, विजयश्री सेवा संस्था, दरीआई माता वृक्ष मित्रपरिवार, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ ज्ञानपीठ बहुद्देशीय संस्था यांसह वन्यजीव अभ्यासक मनीष गोडबोले, मंदार उमाळे, स्वच्छतादूत चंदू पाटील, श्रद्धा गुरगुडे आणि स्पंदन खैरनार यांचा विशेष सहभाग होता.
निवडप्रक्रियेनंतर आता नाशिक महानगरपालिका, वन विभाग, संबंधित शासकीय यंत्रणा आणि पर्यावरणप्रेमी संस्थांच्या सहकार्याने प्रत्यक्ष पक्षी संवर्धनाचा कृती आराखडा राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
निकाल जाहीर झाला म्हणजे हा उपक्रम संपला, असे मुळीच नाही. पक्षी मानचिन्ह निवडणे हा या प्रवासाचा केवळ पहिला टप्पा आहे. गिधाड आणि कावळा या दोन्ही पक्ष्यांचे पर्यावरणीय महत्त्व मोठे आहे. या निवडप्रक्रियेतून निर्माण झालेली जनजागृती आता प्रत्यक्ष पक्षी संवर्धनाच्या चळवळीत रूपांतरीत करणे हे आमचे पुढचे उद्दिष्ट असल्याचे पर्यावरणीपे्रमींनी सांगितले.

मानचिन्ह केवळ नावापुरते न राहता ते कृतीत उतरले पाहिजे. प्रशासनाने पाहिलेले हरित नाशिक आणि हरित कुंभमेळ्याचे स्वप्न साकार करायचे असेल तर नाशिकमधील डोंगरकड्यांचे संरक्षण, जुन्या देशी वृक्षांचे संवर्धन आणि शास्त्रीय कचरा व्यवस्थापन या तीन महत्त्वाच्या बाबींवर प्रत्यक्ष काम होणे गरजेचे आहे. – शेखर गायकवाड (आपलं पर्यावरण संस्था, नाशिक)

Nashik residents’ preference is for the vulture itself

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

तुळशी विवाह : एक आरोग्यदायी प्रथा!

भारतात कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत घरोघरी तुळशी विवाह लावण्याचा प्रघात आहे.…

5 minutes ago

बूमरँग

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाची देशविदेशात चर्चा…

13 minutes ago

कॉलनी रस्त्यांचे घोडे अडले कुठे?

स्थायीत सदस्यांचा संताप; मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ : सभापती नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांना…

45 minutes ago

एसटी नाशिक विभागाचे दिवाळीत 25.67 कोटींचे उत्पन्न

दिवाळीची हंगामी भाडेवाढ न करताही विभागाच्या उत्पन्नात 1.35 कोटींची वाढ नाशिक : प्रतिनिधी यंदाच्या दिवाळी…

50 minutes ago

नाशिक झेडपी करवसुलीत अव्वल

बालके यंदा हक्काच्या लाभापासून वंचित; 2 कोटी 11 लाखांचा निधी वर्ग होणार नाशिक : प्रतिनिधी…

56 minutes ago

दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

साकोरा, वाखारी गावांवर शोककळा     नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव-मालेगाव रस्त्यावर बुधवारी (दि. 18) रात्री…

1 hour ago