नाशिक

नाशिककरांचा खरेदीचा उत्साह अन् वाहतूक कोंडीचा मनस्ताप

मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा

नाशिक : प्रतिनिधी
प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि. 5 नोव्हेंबर) सुरवात होत आहे. दिवाळी सणासाठी शहर व उपनगरातील बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
शहरातील मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, भद्रकाली, तसेच कॉलेजरोड आदी परिसरात नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलून गेल्या होत्या.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नाशिककरांची एकच झुंबड उडाल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोडी झाली होती. वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र होते. दिवाळीच्या सलग सुट्या आणि वेळ मिळेल तसे ऐन सणाच्या तोंडावर धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याने रविवार कारंजा, मेनरोड आणि सीबीएस परिसरासह प्रमुख उपनगरांना वाहनांच्या लांबच लांब रांगांचा विळखा पडत आहे. एम. जी. रोड, रेडक्रॉस सिग्नल, राजेबहाद्दर लेन, शालिमार, मेनरोड, तसेच त्र्यंंबक सिग्नल, अशोक स्तंभ या परिसरात पादचार्‍यांना चालणेही मुश्कील झाले होते. विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत असल्याने वाहतूक कोेंडीत भर पडत असल्याचे चित्र होते. द्वारका, गडकरी चौक, मुंबई नाका आदी परिसरात लहानमोठ्या वाहनांची गर्दी झाली होती. परिणामी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. मध्येच येणार्‍या रुग्णवाहिकांमुळे कोंडीमध्ये अधिकच भर पडत होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसोबत दुकानांसमोरील अनधिकृत पाकिर्ंग आणि रस्त्यांवर थाटलेल्या हंगामी दुकानांंमुळे रस्ते अरुंद झाल्याने पायी चालणारे आणि वाहनधारकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागली.त्यामुळे पायी चालणार्‍या नागरिकांसह वाहनधारकांना अवघ्या काही अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता. मुख्य बाजारपेठांच्या चौकांत हॉर्नमुळे नागरिकांना मनस्ताप होत असल्याचे चित्र दिसत होते. शहरातील सिग्नल सुरू असूनही वाहनधारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने दामटत असल्याचे चित्र होते.
दिवाळी सणानिमित्त नागरिक खरेदीसाठी आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत शहरातील बाजारपेठांत गर्दी करीत आहेत. दिवाळीसाठी कपडे, सजावटीच्या वस्तू, पूजासहित्य, लायटिंग, कृत्रिम फुलांच्या माळा, रांगोळी, आकाशकंदील, नवीन भांडी आदी खरेदी केले जाते.

Nashik residents’ shopping enthusiasm and the ordeal of traffic congestion

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्क्रीन, स्ट्रेस आणि सोशल मीडिया

जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…

5 hours ago

गोपालनाचे आणि गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसूबारस’

दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…

5 hours ago

आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…

5 hours ago

स्त्रीचे खरे सौंदर्य स्वावलंबनात आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात

हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव नाशिक : प्रतिनिधी स्त्रीचे खरे सौंदर्य…

6 hours ago

भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…

6 hours ago

सिंहस्थात आठ हजार कोटींचा घोटाळा

आ. रोहित पवारांंचा महाजनांवर खळबळजनक आरोप भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ…

6 hours ago