नाशिक

स्त्रीचे खरे सौंदर्य स्वावलंबनात आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात

हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव

नाशिक : प्रतिनिधी
स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या बाह्यरूपात नसून, स्वावलंबनात, विचारस्वातंत्र्यात, आत्मविश्वासात आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या क्षमतेत आहे. महिलांनी आई, पत्नी, मुलगी अशा नात्यांपलीकडे जाऊन स्वतःचे अस्तित्व जपावे. घर आणि नोकरीच्या जबाबदार्‍या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे, आवडीनिवडीकडे आणि आनंदाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी येथे केले.
दै. गांवकरी, सोनी पैठणी व मयूर अलंकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवरंगोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. बुधवारी (दि. 4) दै. गांवकरी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पाटील म्हणाल्या, की महिलांनी स्वतःला प्रत्येक बाबतीत परिपूर्ण सिद्ध करण्याचा अनावश्यक ताण घेऊ नये. कुटुंब आणि कार्यालयीन जबाबदार्‍या पार पाडताना स्वतःसाठीही वेळ काढावा. नृत्य, चित्रकला, गायन यांसारखे छंद जोपासावेत. इतरांकडून कौतुकाची अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली, याचे समाधान अधिक महत्त्वाचे आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता तिच्या कर्तृत्वाचा रोजच्या जीवनातही गौरव झाला पाहिजे.
नवरंगोत्सवाचे आयोजन 12 ते 20 ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले होते. नवरात्रोत्सवातील नऊ रंगांनुसार महिलांकडून दररोज छायाचित्रे मागविण्यात आली होती. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दररोज दीडशेहून अधिक छायाचित्रे प्राप्त झाली. त्यांपैकी 70 ते 90 छायाचित्रांना प्रसिद्धी देण्यात आली. नऊ दिवसांत आठशेहून अधिक छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली. त्यातून चिठ्ठीद्वारे भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्या महिलांना सोनी पैठणीतर्फे साडी, तर मयूर अलंकारतर्फे चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला दै. गांवकरीचे कार्यकारी संपादक सचिन अहिरराव, वृत्तसंपादक भागवत उदावंत, मार्केटिंग मॅनेजर आनंद राईकर, उपसंपादक देवयानी सोनार, नयना बारिया, वाहिद बागवान, संदीप भांगरे, अ‍ॅड. प्रतीक्षा चौधरी आदी उपस्थित होते. उपसंपादक अश्विनी पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

महिलांनी स्वतःला सक्षम बनवावे : सुनीता फाल्गुने
महिलांनी केवळ छायाचित्रांपुरते मर्यादित न राहता स्वतःला खर्‍या अर्थाने सक्षम बनवावे. गृहिणी, नोकरदार किंवा उद्योजिका कोणत्याही भूमिकेत असल्या, तरी आपल्या कामाचा अभिमान बाळगावा. घर सांभाळणे हीदेखील मोठी जबाबदारी आहे. मात्र, महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे, ही काळाची गरज आहे. स्वतःच्या गरजा, खर्च आणि आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. स्वतःच्या व्यावसायिक प्रवासाचा अनुभव सांगताना त्यांनी रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात पदार्पण करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचे सांगितले. महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी जिद्द, मेहनत आणि स्वतःवरील विश्वास आवश्यक आहे. महिलांनी एकमेकींच्या यशाचे कौतुक करून अडचणीच्या काळात परस्परांना साथ द्यावी. महिलांना व्यवसाय किंवा लघुउद्योग सुरू करायचा असल्यास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. ’गाव तिथे उद्योग’ ही संकल्पना साकारण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

गांवकरी नवरंगोत्सव

भाग्यवान विजेत्या
♦ रंग-केशरी रंग-पिवळा
♦ प्रणाली आहेर (साडी)
♦ शीतल जगताप (चांदीचे नाणे) नीलिमा पाठक (साडी)
♦ पौर्णिमा चौगुले (चांदीचे नाणे)
♦ रंग-पांढरा रंग-हिरवा
♦ प्रतीक्षा पंडित (साडी)
♦ रेखा जाधव (चांदीचे नाणे) वैशाली वरखेडे (साडी)
♦ अपर्णा कडेकर (चांदीचे नाणे)
♦ रंग-लाल रंग-करडा
♦ तेजल पिठे (साडी)
♦ देवयानी अहिरे (चांदीचे नाणे) समृद्धी शिंदे (साडी)
♦ दक्षता सेनभक्त (चांदीचे नाणे)
♦ रंग-निळा रंग-जांभळा
♦ भाग्यश्री बैरागी (साडी)
♦ विद्या सोनवणे (चांदीचे नाणे) कल्पना पवार (साडी)
♦ अश्विनी गाडेकर (चांदीचे नाणे)
♦ रंग-मोरपंखी
♦ प्रिया खैरनार (साडी)
♦ सुप्रिया ब्रह्मे (चांदीचे नाणे)

The true beauty of a woman lies in self-reliance and creating her own identity.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्क्रीन, स्ट्रेस आणि सोशल मीडिया

जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…

5 hours ago

गोपालनाचे आणि गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसूबारस’

दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…

5 hours ago

आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…

5 hours ago

भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…

6 hours ago

नाशिककरांचा खरेदीचा उत्साह अन् वाहतूक कोंडीचा मनस्ताप

मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा नाशिक : प्रतिनिधी प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि.…

6 hours ago

सिंहस्थात आठ हजार कोटींचा घोटाळा

आ. रोहित पवारांंचा महाजनांवर खळबळजनक आरोप भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ…

6 hours ago