नाशिक

सिंहस्थात आठ हजार कोटींचा घोटाळा

आ. रोहित पवारांंचा महाजनांवर खळबळजनक आरोप
भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यातील विकासकामांत मंत्री गिरीश महाजन यांंंच्या ओळखीच्या लोकांनी तब्बल सात ते आठ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. हा भ्रष्टाचार आपण लवकरच बाहेर काढू, असाही इशारा त्यांनी दिला. दरम्यान, सिंहस्थात 35 हजार कोटींची विकासकामे सुरू असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कुठेच विकासकामे दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय सिंहस्थाची विचारलेली माहिती अधिकारी देत नसल्याचा आरोप आ. पवार यांनी करत अधिकार्‍यांना अल्टिमेटम देत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष छबू नागरे उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले, की मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावचे अधिकारी येथे आणले. नाशिकचे अधिकारी काम करू शकत नाहीत का, असा सवाल केला. नाशिककरांनी विकासकामांत सुरू असणारा भ्रष्टाचार यावर आक्षेप घेतल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही एक-एक रुपयाचा हिशोब घेणार आहोत. अधिकार्‍यांना आम्ही दहा दिवसांची मुदत देतो. तोपर्यंत माहिती दिली नाही तर आम्ही सोडणार नाही. सीएसआरअंतर्गत झाडे लावली होती. ती तोडली आणि त्या अधिकार्‍यांनी हॉटेल टाकले. तो पैसा आला कुठून? तेदेखील आम्ही शोधणार आहोत. नोएडामध्ये मोठा महाल बांधत आहेत. त्यात मोठा खर्च होत असल्याचा आरोप आ. पवार यांनी केला. चांगले रस्ते फोडण्यात आले. यामुळे पावसाळ्यात प्रवास करणार्‍या 16 नागरिकांना प्राण गमवावा लागला. शहरात विकासाची कामे व्हावीत, ही आमची सर्वांची इच्छा आहे. पण धर्माच्या नावावर भ्रष्टाचार होत असेल, तर तोे आम्ही मान्य करणार नाही, असा इशारा पवारांनी दिला. नाशिकमध्ये होणार्‍या रिंगरोडच्या कामाची परवानगी घेतली नाही. शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नाही. संत निवृत्तिनाथ महाराजांंचे नाव कार्यक्रमात घेतले नाही. खड्ड्यांमुळे जे मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

…तर सिंहस्थात केमिकलयुक्त पाणी
एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याना 20 दिवस मुदत देतो. जेथे केमिकलचे पाणी कंपनीमधून टाकले जात आहे त्यावर काम केले नाही, तर महागात पडेल. हा प्रश्न सोडवला नाही, तर सिंहस्थात येणार्‍या साधू-संतांना केमिकलचे पाणी मिळेल, अशी भीतीही आ. पवार यांनी व्यक्त केली.

रामकुंडाची पाहणी
आ. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेपूर्वी रामकुंड परिसराची पाहणी केली. यादरम्यान नागरिकांनी गोदावरी नदी प्रदूषणावर तीव्र चिंता व्यक्त केली. नीरीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नदीपात्रातील काँक्रीटीकरणाबाबत निर्बंध असतानाही विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या कामांमुळे परिसरातील नैसर्गिक झरे बुजविण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली.

प्रमुख पदाधिकार्‍यांची दौर्‍याकडे पाठ
दरम्यान, शहरातील आ. रोहित पवार यांंच्या दौर्‍याकडे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, कोंडाजी आव्हाड, लक्ष्मण मंडाले, गजानन शेलार, महिला जिल्हाध्यक्ष नलिनी शिंदे, युवक शहराध्यक्ष डॉ. जाकिर खान, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वारिस खान आदींसह शहरातील पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती असल्याने यावरून चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, कार्यकारिणी निवडीवरून ही नाराजी असल्याचे समजते.

Rs 8,000 crore scam during Simhastha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्क्रीन, स्ट्रेस आणि सोशल मीडिया

जनरेशन झेड (Gen Z) च्या मानसिक आरोग्याची आव्हाने आणि उपाय हातात अत्याधुनिक स्मार्टफोन, डोळ्यांवर चकाकणारा…

5 hours ago

गोपालनाचे आणि गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसूबारस’

दीपावलीतील पाहिला सण ’वसूबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची…

5 hours ago

आली दिवाळी…

भारतीय संस्कृती आणि परंपरेतील दिवाळी हा सर्वार्ंत मोठा सण असून, हिंदूंच्या या सणाचे विविध धर्मांच्या…

5 hours ago

स्त्रीचे खरे सौंदर्य स्वावलंबनात आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यात

हेमांगी पाटील : दै. गांवकरी नवरंगोत्सवाच्या विजेत्या महिलांचा गौरव नाशिक : प्रतिनिधी स्त्रीचे खरे सौंदर्य…

6 hours ago

भाजपचे स्वीकृतसाठी धक्कातंत्र; शिंदेसेनेचे नाशिकरोडला झुकते माप

नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांत एक-एक वर्षाचे रोटेशन भाजपकडून संदीप लेनकर, अजित चव्हाण, हेमंत धात्रक, रोहिणी…

6 hours ago

नाशिककरांचा खरेदीचा उत्साह अन् वाहतूक कोंडीचा मनस्ताप

मुख्य बाजारपेठांसह उपनगरांत वाहतूक कोंडीचा विळखा नाशिक : प्रतिनिधी प्रकाशपर्व अर्थात, दिवाळी सणाला आजपासून (दि.…

6 hours ago