नाशिक

पर्यटन नकाशावर येणार नाशिकची चांदी

 पर्यटकांना घडणार ‘चांदीची सफर’

पर्यटन विभागाचे उपसंचालक नंदकुमार राऊत यांचे प्रतिपादन

नाशिक : प्रतिनिधी
मंदिरे, लेण्या, नद्या, घाट, धरणे, जंगल आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांची परंपरा यामुळे नाशिकला वैभवशाली वारसा लाभला आहे. सिंहस्थ कुंभपर्व आणि समृद्ध प्रथा-परंपरांबरोबरच नाशिकचा ऐतिहासिक व्यापारही शहराच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. नाशिकची चांदी अत्यंत शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. या चांदीला पर्यटन नकाशावर आणण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करेल, असे पर्यटन विभागाचे उपसंचालक नंदकुमार राऊत यांनी सांगितले.
पर्यटकांना नाशिकच्या ऐतिहासिक सराफ बाजाराची आणि चांदीच्या कारागिरीची ओळख व्हावी, यासाठी सराफ असोसिएशनने नियमितपणे ‘चांदीची सफर’ हेरिटेज वॉक आयोजित करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आयबीजेए आणि नाशिक सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चांदीला जाणून घेऊया’ या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. चांदी निर्मितीची प्रक्रिया, पारंपरिक कारागिरी आणि नाशिकच्या चांदीचा ऐतिहासिक वारसा याची माहिती देणार्‍या या उपक्रमात श्री. राऊत बोलत होते.
यावेळी उत्तर महाराष्ट्र आयबीजेएचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, चांदी उत्पादक संघाचे सतीश सोनवणे, महेश घाडगे आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, की नाशिकला चांदीचा इतका मोठा आणि समृद्ध वारसा लाभला आहे, याची आजच्या हेरिटेज वॉकमधून जवळून माहिती मिळाली. आपल्या शहरातील भक्तीस्थळांबरोबरच व्यापारासारख्या ‘शक्तिस्थळांनाही’ जगाच्या नकाशावर आणण्याची गरज आहे. नाशिकची चांदी शुद्ध तर आहेच. मात्र, आजच्या वॉकमधून जगभरात नाशिकच्या चांदीच्या वस्तू, भांडी, मंदिरांसाठी लागणारे साहित्य आणि मूर्तींना मोठी मागणी असल्याचे समोर आले. चांदीचे हे वैभव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सराफ असोसिएशनचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. असोसिएशनची मागणी पर्यटन विभागापर्यंत पोहोचवून नाशिकच्या चांदीला पर्यटन नकाशावर आणण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन.
राजेंद्र दिंडोरकर म्हणाले, की नाशिक सराफ बाजाराला ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे. नाशिकची ही एक वेगळी ओळख असून, हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सराफ बाजाराची नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे. नाशिकच्या चांदीला लाभलेले महत्त्व केवळ नाशिककरांपर्यंत मर्यादित न राहता नाशिकमध्ये येणार्‍या पर्यटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी चांदीची निर्मिती, कारागिरी आणि सराफ बाजाराचा इतिहास पर्यटकांसमोर मांडणारे हेरिटेज वॉक नियमितपणे आयोजित होणे गरजेचे आहे.
चेतन राजापूरकर म्हणाले, की नाशिकच्या सोन्या-चांदीला पर्यटन नकाशावर आणण्यासाठी सराफ संघटना पुढाकार घेत आहे. नाशिकचा ऐतिहासिक सराफ बाजार, शुद्ध चांदीची परंपरा, पारंपरिक कारागिरी आणि चांदीच्या वस्तूंची निर्मिती हा केवळ व्यवसाय नसून नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. हा वारसा पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच पर्यटन संचालकांची भेट घेण्यात येणार आहे. नाशिकच्या सराफ बाजाराला आणि चांदीच्या या समृद्ध परंपरेला हेरिटेज पर्यटनाचा दर्जा मिळावा, तसेच पर्यटकांसाठी नियमित ‘चांदीची सफर’ सुरू व्हावी, अशी मागणी पर्यटन विभागाकडे करण्यात येणार आहे. हेरिटेज वॉकचे सूत्रसंचालन किशोर वडनेरे यांनी केले. त्रिवेणी घाडगे यांनी आभार मानले.

पर्यटन संचालकांची लवकरच भेट घेणार
नाशिकच्या सोन्या-चांदीला पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळवून देण्यासाठी सराफ संघटनांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत पर्यटन क्षेत्राकडे प्रामुख्याने ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे, निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा या अंगाने पाहिले गेले. मात्र, सोने-चांदीचा पारंपरिक व्यवसाय, कारागिरी आणि सराफ बाजार यांना पर्यटनाचा भाग बनविण्याची मागणी नाशिकमधून प्रथमच पुढे येत आहे.

Nashik Set to Shine on the Tourism Map

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago