नाशिक

आता कसं भाऊ म्हणतील तसं!

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्वागताचे शहरात
लागलेले आता कसं भाऊ म्हणतील तसं! बॅनरची चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या राजकीय घडामोडीनंतर नाशिक शहरात गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी लावलेले राजकीय बॅनर सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहेत.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये “आता कसं…भाऊ म्हणतील तसं!“ अशा मजकुराचे फलक झळकले आहेत. विशेषतः जुन्या सीबीएससमोरील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या कोपर्‍यावर भव्य असे तीन बॅनर तथा मोठे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, त्यावरील मजकूर सर्व नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. गिरीश महाजन यांनी नाशिकचे पालकमंत्रिपद मागितले नव्हते आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचाही सुरुवातीला वेगळा विचार होता, तरीही शेवटी ही जबाबदारी महाजन यांच्याकडेच आली, असे म्हटले जाते.
वास्तविक पाहता पालकमंत्री पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माणिकराव कोकाटे यांची नावे चर्चेत होती.दरम्यानच्या काळात माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद गेले. त्यामुळे पालकमंत्रिपद छगन भुजबळ यांनाच मिळेेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना वाटत होते. त्याचप्रमाणे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे मंत्री दादा भुसे यांनाही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळू शकते अशी या पक्षातील अनेकांची अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडले नाही. कुंभमेळामंत्री म्हणून गेले अनेक दिवस काम पाहणारे मंत्री गिरीश महाजन हेच पालकमंत्री म्हणून अघोषितपणे वावरत होते. अखेर आता अधिकृतपणे त्यांना पालकमंत्रिपद मिळाल्याने त्यांचे शहरात जोरदार स्वागतही झाले.
आपण लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू, असे नवीन पालकमंत्री महाजन सांगत आहेत. परंतु एकंदरीत रस्त्यांवरील खड्डे आणि सर्वच विकासकामांची गती बघता नागरिकांमध्ये नाराजी दिसून येते, हेही तितकेच खरे आहे.
राजकीय समीकरणांमुळे हे पद पुन्हा एकदा भाजपच्या गोटात गेले. पालकमंत्रिपद मिळताच महाजन यांचा नाशिकमधील प्रभाव अधिक वाढल्याचे मानले जात आहे. आता जिल्ह्यातील निधी वाटप, नियोजन आणि प्रशासकीय कामांवर भाऊ म्हणजेच गिरीश महाजन यांचाच थेट प्रभाव असणार आहे. नाशिक शहरातील रस्ते, खड्डे, पाणीपुरवठा आणि गोदावरी प्रदूषण यांसारख्या नागरी समस्या सोडवण्यासाठी आता पालकमंत्री गिरीश महाजन काय निर्णय घेतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Now, it will happen just as Bhau says!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago