नाशिक : प्रतिनिधी
नाशिकचे झपाट्याने नागरीकरण होत असल्यामुळे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होत आहे. या उद्देशाने केंद्र सरकारने सन 2026 मध्ये स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा पहिला सर्वंकष वाहतूक आराखडा सन 2016 मध्ये तयार करण्यात आला. याकरिता आता नाशिकमध्ये नागपूर, पुण्याच्या धर्तीवर नियमित मेट्रोवर शिक्कामोर्तब मारण्यात आले आहे. लवकरच शहरात महामेट्रोचे पथक नाशिकमध्ये येऊन पाहणी करण्यात येणार आहे.
बुधवारी (दि. 10) नगरविकास विभागाचे अवर सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. यावेळी बैठकीत नियो मेट्रोवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बुधवारी नगरविकास विभागाचे अवर सचिव गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे एमडी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नाशिकसाठी टायरबेस्ड मेट्रो निओची घोषणा केली होती.परंतु,त्यावर फुली मारत महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेने निओ मेट्रोचा प्रस्ताव दिला होता.परंतु,हा प्रस्ताव देखील आता बारगळला असून नियमीत मेट्रोबाबतची चाचपणी राज्यसरकारने नाशिकमध्ये सुरू केली आहे. निओ मेट्रोचे रुट कायम ठेवून महिनाभरात मेट्रोचे काम सिंहस्थात करायचे,की सिंहस्था नंतर यासंदर्भातील निर्णय मात्र प्रलंबित ठेवण्यात आला आहे. त्यावेळी पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्ता विकास, मालवाहतूक, तंत्रज्ञान व रहदारी अभियांत्रिकी धोरणाचा समावेश करत अर्बन मास ट्रान्झिट या दिल्ली (युएमटीसी) स्थित कंपनीने सर्वंकष वाहतूक आराखडा महापालिकेला सादर केला होता. त्या आराखड्यावरून सिटीलिंक कंपनीची बस सेवा सुरु झाली.
प्रतितास वीस हजार प्रवासी
मेट्रो सुरू झाल्यावर त्यासाठीचा आवश्यक इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्टेशन प्लॅनवरही चर्चा करण्यात येऊन नाशिकरोड येथील मल्टिमोडल हब ते मेट्रोच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत कनेक्टिव्हिटी कशी राहील यावर चर्चा करण्यात आली. त्यासाठी महिनाभरात महारेलचे अधिकारी नाशिकमध्ये येऊन संभावित रुटचा अभ्यास करतील, तसेच संबधित यंत्रणांसोबत बैठका घेऊन अहवाल सरकारला सादर करणार आहेत. दरम्यान, यानिमित्ताने नाशिककरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नाशिकमध्ये प्रतितास 20 हजार प्रवासी मिळत असल्यामुळे त्यात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नियमित मेट्रो किंवा लाइट मेट्रोबाबत चाचपणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Nashik to get a regular metro; decision taken at Mumbai meeting.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…