मोदींच्या नेतृत्वाचा गौरव करणारा विशेष अभिनंदनपर ठराव
नवी दिल्ली : प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, एनडीए सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील सर्वांत मोठे यश म्हणजे देशाची काँग्रेसच्या कुचक्रापासून झालेली मुक्ती होय. काँग्रेसने देशाला लाचार, असमर्थ आणि हीन भावनेच्या (न्यूनगंड) गर्तेत ढकलून दिले होते, त्यातून देशाला बाहेर काढण्याचे काम एनडीएने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करताना सलग 12 वर्षे (4,399 दिवस) पूर्ण केल्याबद्दल नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनडीएच्या घटक पक्षांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मोदींना सन्मानित करण्यात
आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून पंतप्रधानांचे अभिनंदन केले. लोकशाही पद्धतीने सलग सर्वाधिक काळ देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान म्हणून मोदी यांच्या या ऐतिहासिक मैलाच्या दगडाचे एनडीएच्या सर्व नेत्यांनी कौतुक केले.
पंतप्रधान मोदींनी पदावर सलग 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. या ऐतिहासिक टप्प्यासोबतच त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला आहे. पंडित नेहरूंनी पहिल्या सार्वत्रिकनिवडणुकीनंतर 1952 ते 1964 या काळात सलग 4,398 दिवस पंतप्रधानपद भूषवले होते. आता सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत मोदींनी हा नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कामगिरीबद्दल मोदींचे कौतुक करणारा अधिकृत प्रस्ताव संमत करण्यात आला. सर्व केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना उभे राहून (स्टँडिंग ओव्हेशन) मानवंदना दिली आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.
ऐतिहासिक ठराव मंजूर – या बैठकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 12 वर्षांच्या यशस्वी आणि स्थिर नेतृत्वाचा गौरव करणारा एक विशेष अभिनंदनपर ठराव मांडला. या ठरावाला नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी दुजोरा दिला. या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान यांच्यासह एनडीएच्या 35 हून अधिक पक्षांच्या 72 हून अधिक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
बारा वर्षांतील रचनात्मक स्थित्यंतर
एनडीएच्या जाहीर केलेल्या ठरावानुसार, गेल्या 12 वर्षांत भारताने फ्रॅजाइल फाइव्ह अर्थव्यवस्थांच्या यादीतून बाहेर पडत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या काळात जीएसटी कररचना सुधारणा, यूपीआयद्वारे झालेली डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास आणि दहशतवादाविरोधातील ऑपरेशन सिंदूरसारखी कठोर राष्ट्रीय सुरक्षा धोरणे ही मोदी सरकारच्या कार्यकाळाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. पंतप्रधानांनी हा 12 वर्षांचा प्रवास देशातील 140 कोटी जनतेचा विश्वास, विकास आणि लोककल्याणासाठी समर्पित असल्याचे सांगत, राष्ट्र प्रथम या भावनेने विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प यावेळी पुन्हा व्यक्त केला.
Country freed from Congress’s machinations: Prime Minister
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…