कामगार आणि सभासदांच्या ठेवी परत करा, अन्यथा निसाकाच्या गेटवर आत्महत्या करू
निफाड साखर कारखाना कामगारांचा प्रशासनाला व जिल्हा बँकेला निर्वाणीचा इशारा
भाऊसाहेब नगर कार्यस्थळावर कामगार व सभासदांची बैठक संपन्न
निफाड वार्ताहर
: निफाड साखर कारखाना विक्री करण्याचा डाव जिल्हा बँकेने आखला असून जोपर्यंत कामगारांचे 81 कोटी 94 लाख रुपये देणे आणि सभासदांच्या ठेवी मिळत नाही, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही, निफाड कारखाना शेतकऱ्याच्या सभासदाच्या आणि कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलेला आहे, त्याला असा गिळंकृत होऊ देणार नाही, अन्यथा आम्ही सर्व कामगार आत्महत्या करू व गेटवरच फाशी घेऊ, असा संतप्त निर्वाणीचा इशारा निफाड साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित कामगार आणि सभासदांनी दिला. यावेळी निफाड कारखान्याच्या कामगार व सभासदांनी निसाकाच्या गेटवर प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली.
भाऊसाहेबनगर येथील निफाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर निसाका कामगार, सभासद आणि शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. गेल्या काही दिवसांपासून निसाकाबाबत वेगवेगळ्या चर्चा निफाड तालुक्यात सुरू असल्याकारणाने निफाड साखर कारखाना कामगार आणि सभासदांमध्ये संभ्रम पसरला असून जिल्हा बँक सदरील कारखाना विक्री करणार असल्याची चर्चा कामगार आणि सभासदांमध्ये असल्याने निफाड तालुक्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. त्या अनुषंगाने या विषयावर आयोजित बैठकित कामगारांना मार्गदर्शन करताना सरचिटणीस बी.जी.पाटील म्हणाले की, जोपर्यंत निफाड साखर कारखाना कामगारांचे 81 कोटी 94 लाख रुपये कामगारांना व सभासदांना ठेवी मिळत नाही, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू किंवा गेटवर फाशी घेऊ असा संतप्त इशारा दिला. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, करंजगावचे माजी सरपंच व सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, लहू मोरे, नानासाहेब दाते, गोकुळ झाल्टे,अमित ताजने, सोमनाथ झाल्टे यांनी हा कारखाना जिल्हा बँकेला विक्री करू दिला जाणार नाही, कारखाना सुरू करण्यासाठी व कारखाना वाचवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून निसाका वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. माजी आमदार अनिल कदम यांनीही यावेळी बैठकीत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत आपण सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही दिली.
बैठकीला माजी सरपंच तानाजी पुरकर, सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, बाळासाहेब बागस्कर, सुभाष जोमन, विजय रसाळ, विष्णुपंत मत्सगार, पुंडलिक ताजने, शिवाजी मोरे, नितीन निकम, सचिन आढाव, किरण वाघ, केशव झाल्टे, पंढरीनाथ उगले, उत्तम गायकवाड, नानासाहेब बोरस्ते, सिताराम मोरे, विजय रसाळ आदींसह पिंपळस कसबे सुकेने मौजे सुकेने वडाळी शिरसगाव, चांदोरी, सायखेडा, करंजगाव व गोदाकाठच्या विविध गावांमधून सभासद शेतकरी आणि कामगार उपस्थित होते.
फोटो : १) निफाड साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर निसाका विक्री विरोधात घोषणाबाजी करताना सभासद व कामगार.
२) निसाका कार्यस्थळावर कामगार संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना खंडू बोडके पाटील समवेत व्यासपीठावर पदाधिकारी प्रमोद गडाख, बी.जी पाटील, दिनकर निकम व इतर
निफाड साखर कारखाना हा सभासद यांच्या मालकीचा असून भाडेपट्टा कराराची पुनर्रचना करावी. सत्तेचा दुरुपयोग करून निफाड कारखाना गिळंकृत करण्याचा काही महाभागांचा डाव आहे. सभासद व कामगारांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल. निफाड कारखाना कुठल्याही परिस्थितीत विक्री करू दिला जाणार नाही असा निर्धार आजच्या बैठकीत सभासद व कर्मचाऱ्यांनी केला आहे.
– खंडू बोडके पाटील (करंजगाव) सभासद शेतकरी
निफाड कारखान्याच्या मालमत्ता विक्रीला आमचा ठाम विरोध आहे. कामगारांचे ८१ कोटी रुपये देणी असताना जिल्हा बँकेने विक्रीचा घाट घातला आहे. हा कारखाना कधीही विक्री करू दिला जाणार नाही त्यासाठी आम्ही तीव्र जनआंदोलन उभारू.
– प्रमोद गडाख, कार्याध्यक्ष कामगार संघटना
बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…
मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…
मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…
दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी…
खामखेड्यातील सालगड्याचा मुलगा झाला पोलीस आदिवासी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यश महेश शिरोरे खामखेडा:…