नाशिक

54 मंडळांत 21 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही!

15 मंडळांत 40 दिवसांहून अधिक खंड; सिन्नरच्या 8 मंडळांतील खरीप पिके संकटात

सिन्नर : प्रतिनिधी
आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांची चिंता आता वाढू लागली आहे. सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे खरीप पिके पाण्याअभावी करपू
लागली आहेत.
15 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील 54 कृषी मंडळांत 21 दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडला असून, तब्बल 15 मंडळांत 40 दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे अनेक भागांत खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सुरुवातीच्या पावसावर उगवलेली पिके आता जमिनीतील ओलावा संपल्याने संकटात सापडली आहेत. अनेक ठिकाणी मका, सोयाबीनसह खरीप पिकांची वाढ खुंटली असून, काही भागांत पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास शेतकर्‍यांचा आतापर्यंतचा उत्पादन खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ स्तरावर दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा सुरू असल्याने शेतकर्‍यांच्या नजरा आता शासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसेच दुष्काळी मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा खंड अत्यंत गंभीर बनला आहे. देवळा तालुक्यातील उमराणे येथे 45 दिवस, तर कळवण तालुक्यातील मोकभणगी येथे 40 दिवस पाऊस झालेला नाही. मालेगाव तालुक्यातील कौळाणे, सौंदाणे व निमगाव येथे प्रत्येकी 45 दिवस, तर दाभाडी येथे 44 दिवसांचा खंड आहे. नांदगाव तालुक्यातील जातेगाव, हिसवळ बु. आणि भर्डी येथेही प्रत्येकी 45 दिवस पाऊस गायब आहे.

मालेगाव-सिन्नर-येवल्यात सर्वाधिक फटका

21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड असलेल्या मंडळांची संख्या मालेगाव, सिन्नर आणि येवला तालुक्यांत प्रत्येकी 8 आहे. नांदगावमध्ये 7, बागलाण व कळवणमध्ये प्रत्येकी 6, तर चांदवड, देवळा आणि नाशिक तालुक्यांत प्रत्येकी 3 मंडळांचा समावेश आहे. दिंडोरी व निफाडमधील प्रत्येकी एका मंडळातही दीर्घ पावसाचा खंड
नोंदवला आहे.

उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता

सिन्नर तालुक्यातील 12 पैकी आठ कृषी मंडळांत 21 ते 40 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे खरीप पिकांची स्थिती चिंताजनक आहे. ज्या भागात थोडेफार पाणी उपलब्ध आहे, तेथेही अपुर्‍या पावसामुळे 40 ते 50 टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. काही पिकांमध्ये ही घट 50 ते 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. – ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी

सिन्नरच्या आठ मंडळांत पावसाचा ‘ब्रेक’

सिन्नर तालुक्यातील सिन्नर, शहा, नांदूरशिंगोटे, सोनांबे, डुबेरे, वावी, वडांगळी आणि गोंदे या आठ कृषी मंडळांना दीर्घ पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. शहा 42, सिन्नर 40, सोनांबे 37, वडांगळी 27, नांदूरशिंगोटे 25, डुबेरे 25, वावी 25 तर गोंदे मंडळात 23 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. या मंडळांतील खरीप पिकांना सध्या पाण्याच्या प्रतीक्षेत तग धरावा लागत आहे.

No sign of rain in 54 administrative circles for 21 days!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

4 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

4 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

4 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

5 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

5 hours ago