शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे : जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ
नाशिक : प्रतिनिधी
गुणवंत शिक्षक पुरस्कार हा गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदारी अधिक व्यापक करणारा आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपल्या शाळेपुरते कार्य मर्यादित न ठेवता परिसरातील शाळांमधील गुणवत्तावाढीसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी आणि आपल्या अनुभवातून इतर शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संस्कृती निर्माण करावी, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, नाशिक येथे जिल्हा परिषद नाशिकच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ 2026 मध्ये ते बोलत होते. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ.जयकुमार आढे, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी (योजना) सरोज जगताप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सालमेटी, सेवानिवृत्त शिक्षक संजय कळमकर, गटनेते तथा नगरसेवक अजय बोरस्ते यांच्यासह शिक्षक, शिक्षण समिती सदस्य, गुणवंत शिक्षकांचे कुटुंबीय व अधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणातून ज्ञानासोबत संस्कार, मूल्ये आणि शिस्तीची रुजवणूक होणे आवश्यक आहे. सुपर हंड्रेडसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील दोन वर्षे मोबाइल, सोशल मीडिया व अनावश्यक मनोरंजनापासून दूर राहून केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत निपुण मिशन नवोदय पोर्टलचे अनावरण, कॉफी विथ सीईओ/ ईओ, गुणवत्तापूर्व शाळा डॅशबोर्ड, जिल्हास्तरीय शाळा भेटी डॅशबोर्ड, ‘सुपर 100’ या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक अवधूत खाडगीर, माधुरी खाडगीर व मीना देवरे यांनी मानोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्रीमती सामलेटी
यांनी केले.
या गुणवंत शिक्षकांचा झाला सन्मान
1. बागलाण तालुका- माधुरी सुभाष पवार, अजमीर सौंदाणे, 2. चांदवड तालुका- सतीश भाऊसाहेब अहिरे, काजीसांगवी, 3. देवळा तालुका- सतीश गोविंदराव आहेर, आहेर वस्ती, 4. दिंडोरी तालुका- भिलाजी माधवराव पाटील, उमराळे खुर्द, 5. इगतपुरी तालुका- अवधूत रामदास खाडगीर, भरविर खुर्द, 6. कळवण तालुका- सविता तानाजी भामरे, कळवण मुली नं. 1, 7. मालेगाव तालुका- मीना निषा देवरे, सौंदाणे नं. 1, 8. नांदगाव तालुका- गणेश पुंडलिक साळी, गंगाधरी मोठी, 9. नाशिक तालुका- विवेक पुंडलिक खैरनार, महादेवपूर, 10. निफाड तालुका- गौरी राजेंद्र गायवन, तळेगाव वाट, 11. पेठ तालुका- योगेंद्र गणपत बोरसे, दोनवाड, 12. सिन्नर तालुका- प्रकाश दत्तू जगताप, धोंडबार, 13. सुरगाणा तालुका- सुधाकर कृष्णा भोये, सुरगाणा नं. 1, 14. त्र्यंबकेश्वर तालुका- संदीप दत्तात्रय गुंजाळ, वाघेरा, 15. येवला तालुका- योगेश बाळासाहेब माकोणे, दुगलगाव. यावेळी राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या महानगरपालिका शाळा क्रमांक 18, आनंदवली येथील उपशिक्षिका कुंदा बच्छाव यांचाही सत्कार करण्यात आला.
‘सुपर फिफ्टी’च्या यशातून ‘सुपर हंड्रेड’चा विस्तार
मर्यादित आर्थिक परिस्थिती असलेल्या मात्र गुणवत्ता व क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते मोठी कामगिरी करू शकतात. ‘सुपर फिफ्टी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे उल्लेखनीय परिणाम दिसून आले आहेत. याच धर्तीवर ‘सुपर हंड्रेड’ उपक्रमाचा विस्तार करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
Meritorious teachers should spread the flame of excellence to other schools.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…