नाशिक

द्वारका परिसरातील व्यावसायिकांना नोटिसा

महिनाभराचा अल्टिमेटम

नाशिक : प्रतिनिधी
मनपाच्या द्वारका परिसरातील मालकीच्या जागेवर वर्षानुवर्षे व्यवसाय थाटणार्‍या व्यावसायिकांना महापालिकेने नोटिसा धाडण्यास सुरवात केली आहे. संबंधितांनी महिनाभराच्या आत दुकान काढून घेण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सार्वजनिक हितासाठी ही जागा आवश्यक असल्याचे नमूद करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाचे कामही मंजूर झाले असल्याचा दाखला नोटिशीत देण्यात आला आहे. याशिवाय या जागेवर कुंभाच्या दृष्टीने कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. संबंधितांनी निर्धारित मुदतीत म्हणणे सादर न केल्यास किंवा सुनावणीस अनुपस्थित राहिल्यास, उपलब्ध अभिलेखांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. त्यानुसार महापालिकेच्या मालकीच्या जागेवर व्यावसायिक वापर करणार्‍यांना एक महिन्याच्या आत सदर जागा रिकामी करण्याची नोटीस पूर्व विभागाने बजावली आहे. द्वारका सर्कल परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि वाहतुकीची मोठी वर्दळ आहे. या भागात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले, तसेच हॉटेल्स आहेत. नाशिक-पुणे मार्ग आणि मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिशीत नमूद आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ता रुंदीकरण, पर्यायी व सेवा रस्ते उपलब्ध करून देणे, पादचार्‍यांसाठी सुविधा उभारणे, तसेच इतर सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ही जागा महापालिकेला आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर 1973 मध्ये ही जागा दुकानदारांना भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. तेव्हापासून या जागेवर 75 हून अधिक व्यावसायिक व्यवसाय करत आहेत.

व्यावसायिकांना बाजू मांडण्याची संधी
दरम्यान, जागा रिकामी करण्याचा आदेश देण्यापूर्वी संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. नोटिशीत संबंधितांना लेखी म्हणणे आणि त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सुनावणीच्या दिवशी स्वतः, वकिलामार्फत किंवा अन्य कायदेशीर प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याची परवानगी आहे. 21 ते 23 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीसाठी उपायुक्त (अतिक्रमण) यांचे कार्यालय, पहिला मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.

 

Notices to businessmen in Dwarka area

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 hours ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 hours ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

3 hours ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

3 hours ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

3 hours ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

3 hours ago