महापालिकेकडून वीस ठिकाणी कार्यरत
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील हवेचा निर्देशांक (एक्यूआय) उच्च दर्जाचा चांगला असावा, याकरिता नाशिक महापालिकेने हवेत्तील दूषित व घातक घटक शोषून घेण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वीस डस्ट कलेक्टर लावले आहेत. वाहनांची ज्या भागात खूपच वर्दळ असते तेथे हे यंत्र लावण्यात आले आहे. सदर यंत्र हवेतील घातक धूलिकण खेचून हवा शुद्ध करण्याचे काम करत आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या नाशिकमध्ये हवेची गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका हे संयुक्त प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, 2023 व 24 मध्ये शहरातील हवेची गुणवत्ता घसरल्याचे चित्र होते. मात्र, त्यानंतर हवेच्या निर्देशांकात कमालीचा सुधार पाहावयास मिळाला. 2025 मध्ये नाशिकने टॉप टेनमध्ये एन्ट्री करत पाचवे स्थान पटकावले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर झालेल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नाशिक देशातील शुद्ध हवेच्या टॉप-10 शहरांमध्ये पाचव्या स्थानी आले आहे. हवा स्वच्छतेत देशात नाशिकची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी महापालिकेचा पर्यावरण विभाग प्रयत्न करत आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनें (एनकॅप)तर्गत महापालिकेला निधी मिळत असतोे. या निधीचा उपयोग विशेषत: पर्यावरणीय बाबींवरच खर्च केला जातो. यंदा एनकॅपअंतर्गत महापालिकेला पाच कोटींचा निधी मिळाला असून, त्यातूनच डस्ट कलेक्टर सिटी सेंटर मॉलसह इतर भागात कार्यान्वित केले आहे. डस्ट कलेक्टर वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे साधन आहे. हवेत सोडले जाणारे घातक धूलिकण हवेत पसरण्यापूर्वीच हे यंत्र शोषून घेते.
अशी होते हवा शुद्ध
हे यंत्र प्रदूषित हवा स्वतःकडे खेचून घेते आणि त्यातील लहान-मोठे धूलिकण वेगळे करते. हवेतील हानिकारक कण गाळून (करून) स्वच्छ हवा पुन्हा वातावरणात सोडली जाते. सिमेंट आणि बांधकाम क्षेत्र: सिमेंट, दगड आणि मातीच्या बारीक कणांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी हे अनिवार्य आहे. घातक रासायनिक पावडर किंवा वायू हवेत पसरण्यापासून रोखण्यासाठी डस्ट कलेक्टरचा वापर होतो.शहरातील वायू प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरण विभागाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, याकरिता नुकतेच शहरात डस्ट कलेक्टर लावण्यात आले आहे. याद्वारे दूषित हवा शोषून घेतली जात आहे.
– संगीता नांदूरकर, उपायुक्त, पर्यावरण विभाग, मनपा
The dust collector is absorbing hazardous dust particles from the air.
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…