’ट्राय’चा निर्णय; वर्षभरात 13 ऐवजी 12 रिचार्ज 21 ऑक्टोबरपासून स्वस्त
नवी दिल्ली : प्रतिनिधी
टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)ने मोबाइल ग्राहकांना मोठा दिलासा देत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या ’टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन (13 वी दुरुस्ती) रेग्युलेशन, 2026’ नुसार, आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना 28 दिवसांऐवजी पूर्ण 30 दिवसांच्या वैधतेचे (व्हॅलिडिटी) प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आजवर 28 दिवसांच्या प्लॅनमुळे ग्राहकांना वर्षातील 12 महिन्यांमध्ये तब्बल 13 वेळा रिचार्ज करावा लागत होता. मात्र, या नव्या नियमामुळे ग्राहकांची या अतिरिक्त आर्थिक भुर्दंडातून सुटका होणार असून, त्यांना वर्षातून केवळ 12 वेळाच रिचार्ज करावा लागेल.
या निर्णयातील आणखी एक मोठा फायदा म्हणजे ’फक्त कॉलिंग आणि एसएमएस’ सेवेची सक्ती. जे ग्राहक इंटरनेट डेटाचा वापर करत नाहीत, जसे की ज्येष्ठ नागरिक, साधे कीपॅड फोन (फिचर फोन) वापरकर्ते किंवा जे फक्त वाय-फायवर अवलंबून असतात, त्यांना आता इंटरनेट डेटासाठी विनाकारण जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाहीत. ट्रायच्या या नव्या आदेशानुसार, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या सर्व प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्सना आता 30 दिवस किंवा त्याहून कमी वैधतेचे खास ’व्हॉइस आणि एसएमएस’ स्पेशल टॅरिफ व्हाउचर कमी किमतीत उपलब्ध करून द्यावे लागतील. आम आदमी पक्षात असतानापासून सध्याचे भाजापमधील खासदार राघव चड्ढा यांनी हा मुद्दा प्रकर्षाने लावून धरला होता.
टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांच्या होत असलेल्या लुटीकडे त्यांनी सातत्याने मोदी सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर ट्रायने आता हा सुधारित आदेश काढला आहे. 21 ऑक्टोबर 2026 पासून सर्व कंपन्यांना हे स्वस्त आणि डेटा-मुक्त प्लॅन्स बाजारात आणावे लागणार आहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि दोन सिमकार्ड (ड्युअल सिम) वापरणार्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना त्यांच्या आर्थिक बजेट आणि प्रत्यक्ष गरजेनुसार योग्य तो प्लॅन निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळणार आहे.
Now get a full 30-day validity recharge instead of 28 days.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…