व्ही. राधा : स्पर्धा परीक्षा पद्धतीत सातत्य आवश्यक
नाशिक : प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, तसेच खासगी प्रशिक्षण संस्थांसाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असावा, यासाठी कायदे अधिक कडक करण्याची सूचना आम्ही करणार आहोत, असे स्पर्धा परीक्षा टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सांगितले.
राज्यातील सहाही महसूल विभागांत परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बुधवारी (दि. 30) त्या नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. संवाद या प्रक्रियेत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. 30 हजारांहून अधिक ई-मेलमधील सूचना आणि प्रश्नांंचा अभ्यास करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पेपरफुटीमध्ये खासगी क्लासेससह यंत्रणेतील व्यक्तींचाच सहभाग उघड झाल्यानंतर त्यासंदर्भात विचारले असता, व्ही. राधा यांनी याप्रकरणी कडक कायदे करण्याची सूचना करणार असल्याचे सांगितले. परीक्षा पद्धतीत वारंवार बदल न करता नवीन पद्धतीला किमान पाच ते सहा वर्षांचे सातत्य असावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. निश्चित वेळापत्रक जाहीर करून परीक्षा आणि निकाल वेळेत घेण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे. देशातील आणि आवश्यकतेनुसार परदेशातील चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून तीन महिन्यांत शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी कधी करायची याचा निर्णय शासन घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल (निवृत्त) अजित भोसले, विभागीय आयुक्त तथा समिती सदस्य डॉ. प्रवीण गेडाम, सदस्य डॉ. एन. वीरेंद्र सिंह उपस्थित होते.
Officials and organizations should also have a code of conduct.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…