लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव व विंचुर येथे कॅस्ट्रोल कंपनीचे बनावट ॲाईल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर लासलगाव पोलीसांनी कारवाई केली असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फरमान कबीर हसन राहणार उद्योग विहार गुरगाव,राज्य हरियाणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात भा द वि कलम अंतर्गत इम्तियाज इसाक काजी राहणार पिंपळगाव नजीक,मनीष अशोकराव खुटे राहणार पिंपळगाव नजीक,निलेश भीम शर्मा राहणार लासलगाव तसेच संतोष जगन्नाथ राऊत राहणार विंचूर तालुका निफाड हे कॅस्ट्रॉल कंपनीचे डुप्लिकेट ऑइल विकत
असल्याची फिर्यादी दिल्याने या सर्व व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 19,691 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लासलगाव पोलिस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ कोठाळे,पोलीस हवलदार कैलास महाजन, संदीप शिंदे,प्रदीप आजगे,सागर आरोटे,सुजय बारगळ, कैलास मानकर व देविदास पानसरे यांच्या पथकाने कारवाई केली.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…