शहरात डेंग्यूचा दररोज एक रुग्ण तीन आठवड्यांत 22 जण बाधित

नाशिक : प्रतिनिधी
शहरात पावसाळा सक्रिय होताच जुलैच्या 21 दिवसांतच डेंग्यूसदृश आजाराचे 238 रुग्ण आढळले होते.
या रुग्णांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत पाठवले असता, त्यात 22 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. डेंग्यूच्या संशयितांचा आकडा 260 पर्यंत पोहोचला असून, आतापर्यंत डेंग्यूबाधितांचा आकडा 45 वर पोहोचला आहे. डेंग्यूपाठोपाठ चिकनगुनियाचीदेखील लागण होत असून, आतापर्यंत दोघांना लागण झाली आहे.
यंदाही शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत असताना दिसत आहे. घरांच्या परिसरातील भंगार साहित्य, निकामी टायर्स, शोभेच्या झाडांच्या कुंड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यूस कारणीभूत ठरणार्‍या डासांची पैदास झाल्याने डेंग्यूची लागण झाली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत दोन चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले असून, जानेवारीपासून पाच रुग्ण
झाले आहेत.
आतापर्यंत चिकनगुनियाचे 624 संशयित निष्पन्न झाले आहेत. सोबतच तापसदृश्य आजाराच्या रुग्णांचा आकडा हा मोठा असून, त्यांची नोंद मात्र होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होता. शहरात साथीच्या आजारांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे धूरफवारणी मात्र कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. पावसाचे आगमन होताच, शहरात डेंग्यूचा उद्रेक पहायला मिळत असून, जुलैच्या तीन आठवड्यांत 22 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे डेंग्यूसह साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असताना धूरफवारणी मात्र कागदावरच असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात चिकनगुनियाचेही दोन रुग्ण आढळून आले असून, साथीच्या आजाराने डोक वर काढल्याचे चित्र आहे. शहरात दरवर्षी पावसाळा आला की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. एडिस एजिप्ती नावाचे मादी डास डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. या डासांचा प्रादुर्भाव स्वच्छ पाण्यात होतो.

One dengue patient reported daily in the city; 22 people infected in three weeks.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *