राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू

भुवनेश्वर : प्रतिनिधी
ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथपुरी रथयात्रेदरम्यान एक मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे अचानक चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 120 जण जखमी झाले आहेत. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन घेण्यासाठी आणि रथ ओढण्यासाठी देशभरातून लाखो भाविक पुरी येथे दाखल झाले असताना, या प्रचंड जनसागरामुळे हा भीषण प्रकार घडला.
रथयात्रेच्या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्यामुळे अनेक भाविकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि गोंधळ उडाला. यातूनच चेंगराचेंगरी आणि धावाधाव माजल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. या घटनेत जखमी झालेल्या आणि गुदमरून बेशुद्ध पडलेल्या सुमारे 120 भाविकांना तातडीने पुरी येथील स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय पथकांकडून जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आपत्कालीन पथकांच्या मदतीने भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

One devotee dies in a stampede during the Jagannath Rath Yatra.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

34 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

37 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

51 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

55 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

59 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago