सिडको : प्रतिनिधी
जलालपूर शिवारात आळंदी नदीवरील पुलानजीक कार अपघातात एक ठार, तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली. दुगावकडून येताना या पुलाजवळ मोठे वळण आहे. तिथे अंदाज आला नाही तर गाडी नियंत्रणात राहत नाही. यापूर्वीही तिथे असे दोन अपघात झालेले आहेत. या अपघातात कार थेट नदीपात्रात पडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गिरणारे येथून नाशिकच्या दिशेने येत असताना जलालपूर शिवारातील वळणावर भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मंगळवारी (दि. 29) पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास घडला. यावेळी कार (एमएच 15-जेएफ 5709) पुलावरून खाली कोसळले. याठिकाणी पुलाला कठडेही नसल्याचे सांगण्यात येते. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रिन्स अमित चव्हाण (वय 20, रा. हनुमानवाडी, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रिन्स चव्हाण याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
One killed in car accident near bridge in Jalalpur area.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…