कोर्या धनादेशांचा गैरवापर करून शेतकर्याची फसवणूक
सिडको : प्रतिनिधी
वडिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या कोर्या धनादेशांवर स्वाक्षर्या करून घेण्यात आल्या. तसेच त्यांचा मोबाइल ताब्यात घेऊन त्याचा गैरवापर करीत बँक खात्यातून तब्बल सात कोटी चार लाख रुपयांची रक्कम परस्पर वळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दर्शन अशोक थोरात, सुलभ कोईराला, शुभम सोनवणे आणि सफायर रियल इस्टेटच्या मालकाविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत प्रकाश आगळे (वय 43, रा. दिंडोरी रोड, म्हसरूळ) यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली आहे. मार्च 2026 ते 1 जुलै 2026 या कालावधीत पंचवटी कारंजा येथील मानस आर्केडमधील त्यांच्या वडिलांच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, दर्शन थोरात याने आगळे यांच्या वडिलांशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कोर्या धनादेशांवर स्वाक्षर्या करून घेतल्याचा आरोप आहे. त्याचदरम्यान आगळे यांच्या वडिलांचा मोबाइलही चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मोबाइल क्रमांक आणि कोर्या धनादेशांचा वापर करून श्री महेश को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नाशिक मुख्य शाखेतील खात्यातून विविध धनादेशांद्वारे रक्कम काढण्यात आल्याचा आरोप आहे. काढलेली रक्कम दर्शन थोरात याच्यासह सुलभ कोईराला, शुभम सोनवणे आणि सफायर रियल इस्टेट यांच्या नावावर वळविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या व्यवहारांद्वारे एकूण सात कोटी चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या तक्रारीची दखल घेत पंचवटी पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात आणि कटकारस्थान तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
Over seven crore siphoned off from bank account
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…