सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड परिसरात बस प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश बाबुलाल माळी (वय 53, रा. श्रीराम किराणा समोर, दत्तनगर, अंबड, नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड बस स्टॉप ते कॉन्टिनेन्टल कंपनी बस स्टॉप, अंबड या सिटी बस प्रवासादरम्यान त्यांची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
या बॅगेत 50 हजारांंचा अंदाजे एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, 25 हजारांची सोन्याची अंगठी (पाच ग्रॅम), 25 हजारांची सोन्याची नथ (पाच ग्रॅम) आणि दहा हजार रुपये रोख रक्कम (100 रुपयांच्या शंभर नोटा), असा एकूण अंदाजे एक लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या घटनेनंतर तातडीने अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार झोले तपास करत आहेत.
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…