नाशिक

दहशत पसरवणारा एक जण गजाआड

पिस्तूल अन् जिवंत काडतूस जप्त, उपनगर पोलिसांची धडक कारवाई

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जयभवानी रोड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गावठी कट्ट्याच्या जोरावर दहशत निर्माण करणार्‍या आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवणार्‍या सराईत गुन्हेगाराला उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून 32 हजार रुपयांचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत (वय 19, रा. गांधीधाम, देवळाली गाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याने हा कट्टा अमन शेख (रा. गोसावीवाडी) याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील ऑन-रेकॉर्ड गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी अंमलदार पंकज कर्पे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जयभवानी रोड परिसरात गावठी कट्टा दाखवून दहशत माजवणारा सौरभ बहोत हा वालदेवी नदीकाठच्या अण्णा गणपती पुलाजवळील वीटभट्टी परिसरात थांबला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच सौरभने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने पाठलाग करून अण्णा गणपती पुलासमोर, विहितगाव रोड येथे त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, 30 हजार रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल आणि दोन हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस असा एकूण 32 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार पंकज कर्पे यांच्या फिर्यादीवरून सौरभ बहोत व अमन शेख यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार विनोद लखन
करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संजय पिसे, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, सुनील बडे, पीएसआय प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, संदेश रगतवान, सुनील गायकवाड, योगेश जाधव, पंकज कर्पे, सूरज गवळी, प्रशांत देवरे व सहकार्‍यांनी केली.

One person spreading terror put behind bars.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago