नाशिक

निफाडमध्ये एलपीजी गॅस पंपावर दरोडा

चाकूचा धाक दाखवून 31 हजारांचा ऐवज लंपास

निफाड : तालुका प्रतिनिधी
निफाड शहराजवळील रसलपूर फाटा येथील कॉन्फिडन्स एलपीजी गॅस पंपावर पहाटेच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली. चोरट्यांनी गॅस पंपाच्या केबिनचा काचेचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि सेल्समनला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. या घटनेत रोकडसह मोबाइल असा एकूण 31 हजार 150 रुपयांचा ऐवज
लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास भास्कर मोगल (वय 50, रा. निफाड) हे गेल्या दहा वर्षांपासून या गॅस पंपावर सेल्समन म्हणून काम करत आहेत. 17 ऑगस्टला पहाटे 4.30 ला तोंडाला मास्क बांधलेल्या तीन चोरट्यांनी केबिनचा दरवाजा लोखंडी टामीने फोडला. “सीएनजी गॅस आहे का?” अशी विचारणा करत चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि विलास मोगल यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली.
चोरट्यांनी मोगल यांच्या खिशातील व केबिनच्या ड्रॉवरमधील मिळून 26 हजार 150 रुपयांची रोकड आणि 5 हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाइल, असा एकूण 31 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिन्ही चोरटे अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले. या घटनेमुळे रसलपूर फाटा परिसरात खळबळ उडाली असून, कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, अंमलदार अरविंद ढवळे, धनंजय जाधव, नितीन सांगळे व विनोद जाधव पुढील तपास
करत आहेत.

सुरक्षेसाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतः सतर्क राहणे गरजेचे आहे. व्यावसायिक आस्थापनांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सायरन यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. दुकानात मोठी रोकड ठेवणे टाळावे. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास स्वतः प्रतिकार करण्याऐवजी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
-अभिजित सोनवणे (पोलीस निरीक्षक, निफाड)

Robbery at LPG gas station in Niphad

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

17 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

17 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

17 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

18 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

18 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

18 hours ago