उत्तर महाराष्ट्र

कांद्याच्या भावात घसरण सुरूच

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अश्रू अनावर

लासलगाव  :   समीर पठाण

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात कमालीची घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.१५०० ते २००० हजार रु क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आज मात्र कमीत कमी ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल विकत आहे.येणाऱ्या काळात कांद्याचे भाव वाढतील या आशेवर काही शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून तो कांदा चाळीत साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे तर काही शेतकऱ्यांनी कांदा चाळ नसल्याने नवीन कांदा चाळ तयार करण्याचे काम सुरू केले आहे तर काही शेतकऱ्यांची कांदा काढणी उशीरा झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे शेतात पडून आहेत.

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ४०० ते ५०० बाजारभाव इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच पण वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने यात लक्ष घालण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदा राज्यात सर्वत्र उन्हाळ कांद्याचे पीक अमाप आहे तसेच उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमी आहे.उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.कांद्याच्या दरात होणारी घसरण यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.कांदा लागवड,साठवणूक व विक्री व्यवस्थापन यामध्ये बळीराजाला अनेक अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते. त्यातच महागडी खते,वाढते इंधनाचे भाव,नियमित विजेचा प्रश्न याचाही फटका बळीराजाला बसला आहे.

 

भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते.मात्र यंदा अतिउष्णतेमुळे कांद्याची प्रत खराब होत आहे. प्रत घसरलेल्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून लिलावासाठी आणल्यास योग्य असे बाजारभाव मिळतील

सुवर्णा जगताप सभापती
लासलगाव बाजार समिती

कांदा उत्पादकांना रोख स्वरूपात मदतीची गरज
कांदा हे नगदी आणि चांगला पैसा मिळवून देणारे पीक असले तरी सध्या मात्र बाजारभाव कमी झाल्याने उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे.दिवसेंदिवस वाढणारी मजुरी,खते,औषधे,मशागत यांचे गगनाला भिडलेले दर यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च वाढला आहे मात्र त्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नाही.सद्य परिस्थितीचा विचार करता सरकारने कांदा उत्पादकांना रोख स्वरूपात मदत करणे तसेच बाजारभाव वाढण्यासाठी निर्यातीचे धोरण बदलण्याची नितांत आवश्यकता आहे

सचिन होळकर कृषीतज्ञ

Bhagwat Udavant

Recent Posts

शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न आंदोलन

कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा…

1 week ago

सिडकोत हिट अँड रन; शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू

शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…

1 week ago

लाडक्या बहिणींबाबत शासनाने घेतला आता हा निर्णय

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…

1 week ago

राधाकृष्ण नगरात स्वयंघोषित भाईचा राडा

राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…

1 week ago

अपघातग्रस्त तरुणांवर उपचारास सिव्हिलचा नकार, छावा संघटना झाली आक्रमक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार तक्रार

जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…

1 week ago

वृद्धेच्या गळ्याला चाकू लावत उकळले वीस लाख, पवन पवार विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…

1 week ago