नाशिक

15 ऑगस्टपासून खतांची ऑनलाइन बुकिंग

घरबसल्या स्थानिक कृषी सेवा केंद्रांतील उपलब्ध साठा पाहून शेतकर्‍यास करता येणार बुकिंग

नाशिक, लासलगाव : प्रतिनिधी
शेतकर्‍यांना रासायनिक खतांची उपलब्धता अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 15 ऑगस्टपासून नाशिकसह राज्यातील 12 जिल्ह्यांत खतांची ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू होणार आहे.
या सुविधेमुळे शेतकरी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून जवळच्या कृषी सेवा केंद्रांमधील खतांचा उपलब्ध साठा पाहून थेट बुकिंग करू शकतील. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर संबंधित विक्रेत्याने तीन दिवस खताचा साठा राखून ठेवणे बंधनकारक असेल. शेतकर्‍यांनी निर्धारित कालावधीत केंद्रावर जाऊन पैसे भरून खताचा ताबा घ्यावा लागेल. कृषी विभागाच्या माहितीनुसार, ही योजना प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरल्यानंतर नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, लातूर, धाराशिव आणि गडचिरोलीसह एकूण 12 जिल्ह्यांत लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांना याचा लाभ होणार असून, खतांचा तुटवडा, अनावश्यक गर्दी तसेच काळाबाजार रोखण्यास या व्यवस्थेची मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि संबंधित घटकांनी या डिजिटल उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रवींद्र माने यांनी केले.

अशी असेल प्रक्रिया….

मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी करून लॉगिन करावे. जवळील कृषी सेवा केंद्र व उपलब्ध खतांचा साठा पाहावा. आवश्यक खताची ऑनलाइन बुकिंग करावी. बुकिंगनंतर तीन दिवसांत केंद्रावर जाऊन पैसे भरून खताचा ताबा घ्यावा.

रासायनिक खतांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने हे अभिनंदनीय पाऊल उचलले आहे, मात्र, ऑनलाइन बुकिंगनंतरही खते उचलताना दुकानदार वाढीव रक्कम मागू शकतो, त्यामुळे ऑनलाइन बुकिंगसोबतच ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध व्हावी.
-प्रकाश पाटील, माजी सदस्य, पंचायत समिती

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

18 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

18 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

18 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

18 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

18 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

18 hours ago