नाशिक

साईसंदेश चौकात गॅस पाइपलाइनला गळती

आगीचा भडका, स्थानिकांमध्ये घबराट

पंचवटी : प्रतिनिधी
एकीकडे नाशिककर रस्त्यांतील खड्ड्यांनी त्रस्त झाले आहेत. म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोडवरील साईसंदेश चौकात खोदकाम करताना एमएनजीएल गॅस पाइपलाइन फुटल्याची घटना बुधवारी (दि. 5) दुपारी सव्वादोन वाजता घडली. नित्य वर्दळीच्या रस्त्यावर आगीचा भडका उडाल्याने मार्गस्थ होणारे वाहनचालक स्थानिकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी
दुर्घटना टळली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सद्यस्थितीत पंचवटी विभागात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यात रस्ते काँक्रिटीकरण, ड्रेनेज लाइन, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पाइपलाइन, युटिलिटी, स्मार्ट सिटी, अशी कामे सुरू आहेत. म्हसरूळ-मखमलाबाद लिंकरोडवरील साईसंदेश चौकात रस्तेकामास अडचण झालेल्या भुयारी गटारचे चेंबर बांधकामे खोदकाम सुरू होते. बुधवारी (दि. 5) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पाइपलाइन फुटली आणि पुढील दहा मिनिटांच्या अंतराने अचानक आगीचा भडका उडाला. यावेळी रस्त्यालगत असलेल्या भाजीपाला व फळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांची चांगलीच धावपळ उडाली. प्रसंगावधान साधत एका सुजाण नागरिकाने प्रभाग क्रमांक एकच्या चारही लोकप्रतिनिधी यांना संपर्क साधला. सदरची माहिती अग्निशमन दलास देण्यात आली. पुढील काही वेळातच घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले. सदर आग नियंत्रणात आणली. यावेळी घटनास्थळावर प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक प्रवीण जाधव, नगरसेविका रंजना भानसी, दीपाली गिते, रूपाली नन्नावरे यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सदरची आग पंचवटी विभागीय कार्यालयातील अग्निशमन दलाला प्रभाग क्रमांक एकमधील चारही लोकप्रतिनिधींनी संपर्क साधला. अग्निशमन दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी रवाना झाला. प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे, फायरमन गणेश रकिबे, सिद्धार्थ गोतीस, संकेत वैष्णव, वाहनचालक अशोक सरोदे यांनी आग विझविली.

Gas pipeline leak at Saisandesh Chowk

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

12 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

13 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

13 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

13 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

13 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

13 hours ago