–
चांगल्या मौखिक आरोग्यासाठी टिप्स
ओरोफीट
या आधुनिक जीवनशैलीत, दातांच्या विविध समस्या आणि हिरड्यांचे आजार ह्यासारख्या दंत रोगांमध्ये वाढ होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खाण्याच्या सवयी आणि अयोग्य मौखिक स्वच्छता.
दंत आरोग्यासाठी चांगले अन्न ,फळे भाजीपाला, नियमित जेवण, कोशिंबीर ह्यासारख्या हिरव्या, तंतुमय आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. दातावर जमा झालेला calculus plaque ह्यासाठी दंतवैद्य कडून सफाई करून घेणे तसेच दात घासण्याची योग्य पद्धत जाणून घेऊन दिवसातून दोन वेळा दात घासणे, मौखिक आरोग्य चागले राहण्यासाठी उपयुक्त आहेत. दातांच्या आरोग्यासाठी जंक फूड, जसे की बेकरी उत्पादने, कुकीज, बिस्किटे, गोड पदार्थ इत्यादी जे दातांना चिकटतात आणि पाणी प्यायल्यानंतरही तासनतास टिकून राहतात.
दातांवर चिकटपणा येण्यासाठी हे पदार्थ कारणीभूत असतात जेवणादरम्यान अशा प्रकारचे अन्न खाणे टाळावे किंवा जेवताना आधी चिकट आणि गोड अन्न खावे त्यानंतर नियमित जेवण घ्या.
दंत आरोग्य उत्तम राहण्यासाठी –
1) दररोज योग्य प्रकारे दात घासणे फार महत्त्वाचे आहे. ह्यासाठी दंतवैद्याकडून दात घासण्याची योग्य पध्दत जाणून घेणे आवश्यक आहे.
2)टूथब्रश चे ब्रिसल्स खराब झाल्यानंतर तो बदलणे गरजेचे असते. 3)तुम्ही कोणत्याही प्रकारची टूथपेस्ट वापरू शकता, दात घासण्यापूर्वी आणि नंतर टूथब्रश धुवा, तुमचा टूथब्रश स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. 4)सर्वोत्तम पद्धत म्हणजे प्रत्येक जेवणानंतर चुळ भरा,तोंड स्वच्छ धुवा. 5)नेहमी आरशासमोर उभे राहून दात घासा.
6) नियमितपणे, तुमच्या दंतचिकित्सकाला सहा महिन्यातून एकदा भेट द्या.
7)फ्लॉस वापरताना आपल्या दांतचिकित्सकाचा मार्गदर्शन घ्या.
सुदृढ व निरोगी आोग्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मौखिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे त्यामुळे अनेक शारीरिक आजार होण्याचा धोका टळू शकतो.
आपल्या दातांची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, योग्य आहाराचा व नियमित व्यायामाचा आपल्या दैनंदिनी मधे समावेश करून निरोगी राहा.