मार्कर पुरवणार्‍या कंपनीच्या चौकशीचे आदेश

मुंबई :
महापालिका निवडणुकीत बोटावर मार्करने लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकीसाठी कोरस कंपनीने मार्कर पुरवले आहेत. त्यामुळे या कंपनीची चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी गुरुवारी दिली. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत असा प्रकार होऊ नये म्हणून भारत निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जी मैसूर इंक कंपनीची शाई वापरते ती शाई वापरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराला मतदानाच्या पूर्वी बोटावर मार्करने शाई लावली जात आहे. मात्र, ही शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात समाज माध्यमात व्हिडीओही व्हायरल झाले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने लावलेली शाई सहज पुसली जात असल्याचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निवडणुकीदरम्यान गोंधळ निर्माण करणार्‍यांवर कारवाईचा इशाराही वाघमारे यांनी दिला आहे. सन 2011 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर वापरले जात आहेत. शाई लावल्यानंतर ती सुकायला 10 ते 12 सेकंद लागतात. या कालावधीत मतदार मतदान कक्षातच असतो. एकदा शाई सुकली की ती काढता येत नाही. ज्या प्रकारची शाई मार्करमध्ये आहे तीच शाई भारत निवडणूक आयोग वापरतो. जर शाई पुसून दुबार मतदान झाले, तर संबंधित मतदारावर कारवाई केली जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. शाई सुकण्याआधी ती पुसली गेली तर ती मतदाराची चूक आहे. अशा मतदारांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो, असे ते म्हणाले.
शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी वापरण्यात येणारा मार्कर पेन निकृष्ट दर्जाचा असून शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि युवासेनेचे नेते साईनाथ दुर्गे यांनीही हाच आरोप केला आहे. शाई पुसण्यासाठी सॅनिटायझरचीही गरज नाही. शाई तशीच पुसली जाते, असे परब म्हणाले. तर मी आज सकाळी मतदान केले आणि घरी गेल्यावर डेटॉलने हात धुतला. तेव्हा शाई पूर्णपणे निघून गेली. हा गंभीर मुद्दा असून बनावट मतदानाची शक्यता निर्माण होते, असे दुर्गे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मार्कर वापरला जाणार नाही
मतदान सुरु असतानाच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, बोटाला मार्करद्वारे लावत असलेली शाई एकदा सुकली की ती निघू शकत नाही. ज्या लोकांनी शाई पुसण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी काय वापरले हे आम्हाला माहिती नाही. समाजात फेक नरेटिव्ह पसरवल्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर पत्रकारांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मार्करचा वापर करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना वाघमारे यांनी, ‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता 5 फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago