प्रतिमा

आपला आनंद आपल्याच हाती!

खरंच इतकं खूश…आनंदी आपण राहू शकतो का हो! लोकांना प्रश्न पडावा की, हे कायमच इतके खूश कसे राहू शकतात?
चिंतनाचा विषय आहे. कधी केलंय यावर चिंतन? खूश राहिलोच आणि काही चुकीची घटना घडली की, लगेच विचार येतो, दृष्ट लागली बाई कुणाची तरी! बरोबर ना!!
चूक आपण करायची आणि दोष दुसर्‍याला! हा स्वभावच तर आनंद हिरावून घेत असतो आपला. विचार चुकला की, आनंद गायब.
24 तास आपण आनंदी राहू शकतो. फक्त थोडं आध्यात्मिक सायन्स समजून घेतलं, त्याप्रमाणे विचार केला, तशी दृष्टी ठेवली, तसं ऐकलं आणि त्याप्रमाणे बोलायला शिकून वर्तनात आणलं तर नक्कीच आपण 24 तास आनंदी राहू शकतो.
पण हे ना आई-वडील शिकवतात, ना शाळा, ना शिक्षक, ना समाज. हे सायन्स आपल्याला समजदार बनवतं. समजदार म्हणजे प्रत्येक परिस्थितीत समान सुख-दुःख, जय-पराजय, यश-अपयश यात मन स्थिर राहिलं की, खरा आनंद कळतो.
परचिंतन, परदर्शन, परमत यातील तिन्ही पर काढून परोपकारी झालात की, निखळ आनंद काय हे समजेल.
जो आयुष्य जगण्यासाठी रोल मिळाला आहे तो (अगदी झाडू मारण्यापासून ते अगदी मोठ्या ऑफिसरचा असो) स्वीकारून मनापासून निभावला की आनंदाची अनुभूती मिळेल.
थिंक ग्लोबली लाइव्ह लोकली, असा जगण्याचा प्रयत्न केला की, आनंद अवतीभवती पिंगा घालेल.
परमात्म्यावरचा खरा विश्वास निर्माण झाला म्हणजे काय तर आपण भगवान को नहीं चाहते, भगवान से चाहते है! तर असेच का झालं आणि भूतकाळातील मान-अपमानांंना फुलस्टॉप करून भविष्यकाळातील चिंता त्याच्यावर सोडून िीशीशपीं जे त्याने आनंदाने जगण्यासाठी गिफ्ट केलंय ते एन्जॉय केलं, तर का नाही आपण 24 तास आनंदी राहू शकणार बरं?
यासाठी ना मंदिरात जायची गरज, ना पूजा घालायची गरज, ना उपवास करायची गरज, ना माळ जपायची गरज, ना कष्ट घेऊन चारधाम करायची गरज.
आपल्याला वाईट सवय लागली आहे. सतत हातात कटोरा घेऊन मागत बसतो देवा पैसा दे रे, आनंद दे रे, सुख दे रे, शांती दे रे! मात्र, विचार जैसे थे!
राग डोक्यात ठेवणारी अनेक लोकं आहेत (विचार न बदलता मेडिटेशन करणारी, पूजापाठ सांगणारी) अगदी वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या. किती ती बरोबरी, चढाओढ.
बदला घेण्याच्या भावनेतून अगदी खून, मारामार्‍या.
शब्दातून भोचक तीर मारणे, अपमान करणे, बोलणेच बंद करणे. आपणच बरोबर, दुसरा चूक किंवा दुसराच बरोबर मी चूक असा न्यूनगंड.
या गोष्टींवर चिंतन करून आपणच आपल्यात बदल आणले तर का नाही 24 तास आनंदी राहू शकणार?
या सायन्सला समजून उमजून, अगदी याठिकाणी त्याची पोपटपंची करून तसच्या तसं घोटलं, त्यात मन, मत न मिक्स करता आचरणात आणलं तर आनंदाची दालनं नक्कीच उघडतील.
कारण त्यातच अनेक आनंदाचे राज सामावले आहेत.
जीसको राज समजा वो कभी नाराज नही होते है भाई। उन्हेही हम खुश नशीबवाले केहेते है ।
और ये राज सिखाता है राजयोग मेडिटेशन।
अहो आनंद पैशात नका मोजू!
जसं सुख-दुःख, जय-पराजय, शांती-अशांती, आशा-निराशा तसं आनंदाला विरुद्ध काहीच नाहीये!
निव्वळ आनंदच आनंद!
मग गीता ज्ञान बरोबर सांगत आहे नाही!
इतना खुश रहो की दुनिया परेशान हो जाये की इसे किस बात की खुशी है ।

Our happiness is in our own hands!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago