तीनशे किलोमीटरपेक्षा अधिक ओएफसी नेटवर्क उभारण्याचे नियोजन
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, सीसीटीव्ही नेटवर्क आणि ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या काळात प्रशासनाला तंत्रज्ञानाच्या मदतीने परिस्थितीवर लक्ष ठेवता येणार आहे.
नाशिक शहरातील विविध प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांना एकत्रित जोडण्यासाठी तीन कमांड व नियंत्रण केंद्रांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. नाशिक स्मार्ट सिटी कार्यालय, पोलीस आयुक्तालय तसेच महापालिका कार्यालयातील नियंत्रण यंत्रणांचा यात समावेश असेल. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्र नवीन एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे. कुंभमेळ्यातील गर्दी आणि सुरक्षाव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे.सिंहस्थ काळात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार असल्याने शहरातील महत्त्वाच्या भागांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले
आहे.
या कॅमेर्यांच्या माध्यमातून गर्दीची स्थिती, वाहतुकीची हालचाल, तसेच संवेदनशील भागांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. एखादी आपत्कालीन घटना घडल्यास तिची माहिती नियंत्रण केंद्रापर्यंत तातडीने पोचवून संबंधित यंत्रणेला कार्यवाहीसाठी सतर्क करता येणार आहे. ओएफसी नेटवर्कमुळे सीसीटीव्ही कॅमेरे आणि नियंत्रण केंद्रांमधील माहितीची देवाणघेवाण वेगाने होण्यास मदत होईल. परिणामी गर्दीच्या वेळी परिस्थितीचे तत्काळ आकलन करून प्रशासनाला आवश्यक निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे.
सिंहस्थाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येणार असल्याने संभाव्य आपत्तींचा धोका लक्षात घेऊन आपत्ती जोखीम व्यवस्थापनाची यंत्रणाही अधिक सक्षम करण्यात येणार आहे. डिजिटल नियंत्रण केंद्रे आणि निगराणी यंत्रणेच्या माध्यमातून गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद आणि विविध विभागांत समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील या डिजिटल पायाभूत सुविधांमुळे सिंहस्थाच्या काळातील व्यवस्थापन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे. कुंभमेळ्यानंतरही या सुविधांचा वापर सार्वजनिक सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी करता येणार आहे.
तीनशे किलोमीटर ओएफसीचा डिजिटल मार्ग
नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध डिजिटल यंत्रणांना जोडण्यासाठी तीनशे किलोमीटरपेक्षा अधिक ओएफसी नेटवर्क उभारण्यात येणार आहे. सुमारे 128.98 कोटींंच्या या प्रकल्पामुळे सीसीटीव्ही, नियंत्रण केंद्रे आणि विविध प्रशासकीय यंत्रणांमध्ये वेगवान माहितीची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे. या नेटवर्कमध्ये एचडीपीई डक्ट, नेटवर्क मॉनिटरिंग व ऑपरेशन्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म, फायबर पॅच कॉर्ड आणि राउटर मार्कर यांसारख्या सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
चार हजारांहून अधिक कॅमेरे
सिंहस्थाच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिकमध्ये चार हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याचे नियोजन आहे. बुलेट, फिक्स्ड बॉक्स,
एएनपीआर आणि पीटीझेड कॅमेर्यांच्या माध्यमातून प्रमुख मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरावर नजर ठेवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 371.70 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
Over 4,000 CCTVs for Simhastha
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…