नाशिक

प.पू. श्री. प्रीतिसुधाजी म.सा. यांचे क्रांतिकारी पाऊल…

1977-78 मध्ये माताजी म.सा. आणि वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. यांचा चातुर्मास नाशिकमध्ये घेण्याचे ठरलेे, त्याप्रमाणे नाशिकला चातुर्मास मोठ्या आनंदाने आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
चातुर्मासात रात्री प्रवचनांना जैन धर्मामध्ये परवानगी नसते; परंतु आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा. यांच्या संमतीने जैन विचारांना, आचारांना आणि पुरोगामित्व प्राप्त करून नाशिकमध्ये रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, भद्रकाली, राममंदिर या ठिकाणी रात्रीची जाहीर प्रवचने आयोजित केली. मी त्यावेळेस जैन युवक मंडळाचा अध्यक्ष असल्याने त्या जाहीर प्रवचनांच्या आयोजनाची जबाबदारी श्रावक संघाबरोबरच जैन युवक मंडळावरदेखील येऊन पडली. त्यांची अनेक जाहीर प्रवचने त्या काळी नाशिकमध्ये रात्री झाली. आणि अशाप्रकारे वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. यांनी एक क्रांतिकारक पाऊल टाकले व जैन धर्माला व प्रचाराला एक नवी दिशा दिली, नवा मार्ग दाखविला. जैन धर्मात जप, तप याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु,
8 उपवास किंवा त्यापेक्षा जादा उपवास केल्यास त्यांची मिरवणूक (वरात) काढली जायची. गाव जेवणाच्या पंगतीदेखील उठायच्या. यामुळे गरीब जैन कुटुंबात तपश्चर्या व्हावयाच्या नाहीत. अशा वेळेस हा एक प्रश्न श्रावक संघ आणि जैन युवक मंडळाने प्रीतिसुधाजी यांच्यासमोर ठेवला असता, चर्चेअंती तपश्चर्येच्या मिरवणुका बंद करावयाच्या आणि गाव जेवणाच्या पंगती बंद करायच्या, असा निर्णय घेण्यात आला. आणि तो सर्वांनी अमलात आणला. त्यावर्षी अनेक गरिबांच्या घरी 8 उपवास किंवा त्यापेक्षा जादा उपवासांच्या तपश्चर्या होऊ लागल्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यात आले. तसेच या चातुर्मासाने त्यांच्या प्रवचनांचा एवढा प्रभाव पडत असे की, या चातुर्मासात अनेक जैनेतर कुटुंबांतदेखील तपश्चर्या होऊ लागल्या आणि त्यांच्या प्रवचनांच्या प्रभावामुळे अनेक जैनेतर लोकांनी मांस मदिरेचाही त्याग केला. हा त्यांच्या पुरोगामित्वाचा समाजावर पडलेला मोठा प्रभाव होता.
पूज्य प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने श्री जैन युवक मंडळ, नाशिक या संस्थेने आंतरराज्यस्तरावर महाविद्यालयातील पातळीवर आणि शालेय पातळीवर वक्तृत्व स्पर्धा सुरू केल्या. या दोन्ही स्पर्धांमध्ये महावीरांवर एक विषय ठेवला जात असे आणि महावीरांचा अभ्यास शालेय पातळीवर आणि महाविद्यालयीन पातळीवर होऊ लागला. पुढील वर्षी त्यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाने वक्तृत्व स्पर्धेबरोबरच महाविद्यालयीन पातळीवर वादविवाद, वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन आणि उत्स्फूर्त निबंध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येऊ लागले. रोख पारितोषिकांबरोबरच फिरत्या ढाली देण्यात येऊ लागल्या आणि या सर्व स्पर्धांतून एक विजेता काढला जाऊन त्यांना आनंद करंडक दिला जाऊ लागला. या
स्पर्धेचा पहिला स्पर्धाप्रमुख होण्याचा मान मला मिळाला. यासंदर्भात जर पारितोषिक मिळाले तर मराठवाडा विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी एक टक्का जास्त मार्क धरून प्रवेशदेखील दिला जाऊ लागला. त्यांच्या 77-78 च्या चातुर्मासात प्रीतिसुधाजी शिक्षण फंडाची स्थापना झाली. या फंडाची सुरुवात श्रावक संघाच्या नियंत्रणाखाली स्व. कन्हैयालालजी बुरड यांनी सुरुवात केली. हा प्रस्ताव जेव्हा त्यांच्यासमोर ठेवला त्यावेळेस त्यांनी या फंडाची स्थापना जरूर करा; पण त्याला माझे नाव देऊ नका, असे सांगितले होते. परंतु, श्रावक संघाने या फंडाचे नाव प्रीतिसुधाजी शिक्षण फंड असेच ठेवायचे, असे ठरवले. त्यावेळेस बुरड सरांना अनेक जण वेड्यात काढत असत. परंतु, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून हा फंड सुरू केला आणि संस्थेकडे सुमारे पावणेदोन कोटी रुपये असून, त्यांचे व्याज जे जैन गरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात ती रक्कम दिली जाते. आणि हा फंड दरवर्षी वृद्धिंगत होत असतो. या फंडामार्फत जे विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात, त्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत असतात.
पूज्य मधुस्मिताजी म.सा. यांच्या नाशिकरोड येथील चातुर्मासात भक्तामर स्त्रोतावरून ‘भक्तामर भक्ती’ पुस्तक मराठी श्लोकांसह छापावयाचे होते. त्यावेळेस मी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला की, मराठी श्लोकांबरोबरच मराठीतून भावार्थही प्रकाशित करण्यात यावा. मराठीत भावार्थ करण्याचा मला सन्मान मिळाला. श्री. प्रीतिसुधाजी म.सा. आणि श्री. मधुस्मिताजी म.सा. यांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाने ‘भक्तामर भक्ती’ ही मराठी पुस्तिका प्रकाशित केली. त्याचप्रमाणे त्यांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने ‘कल्याण मंदिर भक्ती’ नावाची पुस्तिकादेखील प्रकाशित केली.

गोभक्त प्रीतिसुधाजी म.सा.
पिंपळगाव बसवंत येथील गोशाळेला भेट दिली. गोभक्त पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या संकल्पनेतून सदर गोशाळेची निर्मिती झाली. मोहनलालजी भंडारी व इतर ट्रस्टी यांच्या माध्यमातून पिंपळगाव बसवंतमधील सर्व व्यापारी हे आपल्या रोजच्या नफ्यातील रु. 100 यांस 5 पैसेपासून सुरू झालेला प्रवास आज 15 पैसे इतका आहे. उदाहरणार्थ 1 कोटीचा व्यापार झाला तर त्यातून 15,000 रुपये गोशाळेस सदर व्यापारी देतो. असे हजारो व्यापारी पिंपळगाव बसवंतमध्ये निवासी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्गाच्या नेतृत्वात चालवली जाणारी ही एक महत्त्वपूर्ण गोशाळा आहे. जवळपास 600 गोमाता या ठिकाणी आहेत, ही आनंदाची बाब आहे. सदर गोशाळेस शक्य ती सर्व मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील. महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यप्रणाली यावेळी उपस्थितांना समजावून सांगितली. यावेळी सर्व पशुसंवर्धन विभागांचे डॉ. पाटील व अधिकारी, गोशाळा संचालक व माझे सहकारी अक्षय महाराज भोसले, शशांक ओंभासे, विशाल चव्हाण, राहुल जगताप, डॉ. महेश बूब, डॉ. प्रीती बूब व डॉ.श्रद्धा सबनीस उपस्थित होते.
– शेखर मुंदडा,
अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग
(24 सप्टेंबर 2023)

P.H. Shri. Preeti Sudhaji M.S.’s revolutionary step…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

12 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

31 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

38 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

47 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

55 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago