आठ किमीपर्यंत रांगा; ‘जय हरी विठ्ठला’चा नाद
पंढरपूर :
अवघ्या दोनच दिवसांवर आषाढी एकादशी सोहळा आला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. आषाढी वारीसाठी अजून दोन दिवसांचा कालावधी असताना आज
नवमीलाच विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून आठ
किलोमीटर लांब गेली आहे. अजूनही हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन रांगेकडे येत
आहेत.
मोठमोठे वीस दर्शन मंडप भरूनही आठ किलोमीटरची रांग गेल्यावेळीपेक्षा तीन पट लांब गेली. आषाढी एकादशी यंदा 25 जुलै रोजी आहे. यानिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या काळात पायी चालत वारी करण्याची परंपरा आहे. अशात या एकादशीनिमित्त पंढरपुरात येणार्या भाविकांसाठी खुशखबर आहे, यात्राकाळात प्रसादासाठी मंदिर
समितीकडून तब्बल 12 लाख बुंदी लाडू बनविण्यात आले आहेत. गरजेनुसार ही संख्या अजून वाढविण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सध्या राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरू असताना, मंदिर प्रशासनाने लाडू बनविण्याचे साहित्य आणि बनविलेले लाडू या दोन्हींची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करून घेतली आहे.
गर्दीमुळे मंडप वाढवला. बुधवारी रात्री भाविकांची गर्दी वाढत गेल्यावर पुन्हा तीन किलोमीटरची दर्शनरांग उभी करण्यात आली, पण आता त्याच्याही पुढे भाविक रांगेत असल्याने आता अजून लांब दर्शनरांग बनवायचे काम सुरू झालेले आहे. यावर्षी आधी भाविक रांगेत उभे राहतात आणि नंतर पुढे दर्शनरांगेची लांबी वाढवायची वेळ प्रशासनावर येत आहे. खर्या अर्थाने विठ्ठलाची लांबच लांब रांग काल पाहायला मिळाली.
वारकर्यांचे विसाव्याचे ठिकाण
सध्या संपूर्ण पालखी मार्गावर उभारण्यात आलेले हे विशाल जर्मन हँगर मंडप वारकर्यांचे विसाव्याचे ठिकाण बनत आहे. या केंद्रांमध्ये वारकर्यांना विसाव्यासोबत स्वच्छतागृहे आरोग्य सुविधा, पायाची मसाज, शुद्ध पाणी याची सोय केली असून, याच ठिकाणी रात्री या वारकर्यांना भजन, कीर्तन करण्यासाठीदेखील स्टेज आणि इतर सुविधा करण्यात आल्याचे गोरे
यांनी सांगितले.
Pandharpur witnesses a massive surge of Warkaris; queues stretch up to eight kilometers; the air resounds with chants of ‘Jai Hari Vitthala’.
डोणगावच्या पंचवीसवर्षीय राहुलचा मृत्यू चांदवड : प्रतिनिधी मुलाने मोठे होऊन अधिकारी व्हावे आणि गरिबी दूर…
नवरात्रोत्सव : नैताळेच्या रूपाली बोरगुडे यांची यशोगाथा निफाड : अण्णासाहेब बोरगुडे नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा जागर…
सिडको : प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी मागितलेली एक लाख रुपयांची खंडणी न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून…
मिसफायरमुळे अनर्थ टळला पंचवटी : प्रतिनिधी आडगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलजवळील पुलाखाली रविवारी (दि. 18)…
डिझेल पंपाजवळच थरार! रात्री रस्त्यात बंद पडली, सकाळी डेपोत पेटली सिन्नर : प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या…
सुमारे 100 वर्षांची परंपरा जोपासत आहेत भाविक नाशिकरोड : एस. आर. सुकेणकर एकेकाळी देवळालीगाव बारा…