कॉक्रोच जनता पार्टीकडून घोषणा, देशभरात वणवा
नवी दिल्ली :
नीट पेपरफुटी आणि देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारला जावा, यासाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून राजधानी नवी दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. कॉक्रोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षणमंत्री
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. ‘सीजेपी’च्या 20 जुलैच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने दि. 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘सीजेपी’ने आज देशभरात होणारे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, संपूर्ण देशभरात एकाच वेळी आंदोलन करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. देशभरातील विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांनी या सगळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीने केले आहे. या आंदोलनासाठी आवश्यक असणार्या परवानग्या घ्याव्यात, असेही सांगण्यात आले आहे. सर्व जण एकत्र आल्यानंतर सर्व संघटनांनी ‘सीजेपी’कडून करण्यात आलेल्या चार मागण्या सर्वांना वाचून दाखवाव्यात, असे सांगण्यात आले आहे.
आंदोलनस्थळी इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा द्याव्यात, असे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे. सीजेपीने चार प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, आत्महत्या करणार्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जावी. विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नये. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सीजेपी केलेली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व खासदारांची त्यांच्या निवास्थानी बैठक बोलावली आहे. काँग्रेसनं देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न काँग्रेसकडून मांडण्यात आला. काँग्रेसकडून छात्रों की गुंज याचा पुढील कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून 26 जुलैला संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्तपणे उद्या सायंकाळी 5 वाजता राष्ट्रगीत गायन केले जाणार आहे.
A call for nationwide agitation today
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच सुरक्षेची धाकधूक; 24 तास खडा पहारा त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर…
सात दशकांची परंपरा कायम; रामलीला मैदानावर तयारी नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी सात दशकांची परंपरा…
नाशिक : श्री कालिका माता यात्रोत्सवात लहान-मोठ्यांचे आकर्षण ठरलेले रहाटपाळणे विद्युत रोषणाईमुळे असे विलोभनीय दिसतात.…
सोशल मीडियावर लहान मुलांचे देवीरूपातील फोटोशूट व्हायरल नाशिक : देवयानी सोनार सध्या सोशल मीडियावर एक…
‘लाडकी बहीण’ला धक्का नाही : मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : प्रतिनिधी राज्यात दुष्काळाचे सावट आणि तिजोरीवरचा…
मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम क्षेत्रात सध्या तगडी स्पर्धा सुरू असताना सरकारी कंपनी ’बीएसएनएल’ने पुन्हा एकदा…