कुंभमेळ्यापूर्वी 629.41 कोटींचा विस्तार, 17,800 चौ.मी.चे नवे टर्मिनल
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिकच्या हवाई वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. ओझर विमानतळाच्या विस्तारासाठी 629.41 कोटी रुपयांचा प्रकल्प असून, त्यात 17 हजार 800 चौरस मीटरचे नवे प्रवासी टर्मिनल आणि एक लाख 15 हजार 220 चौरस मीटरचे एप्रन विकसित केले जाणार आहे. विस्तारानंतर विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता ताशी सुमारे एक हजार प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे.
कुंभमेळ्याच्या काळात नाशिकमध्ये वाढणारी हवाई वाहतूक लक्षात घेऊन नव्या टर्मिनलमध्ये प्रवासी सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. विमान उभे करण्याची क्षमता वाढविण्यासोबत एरोब्रिज, सुरक्षा तपासणी, सामान हाताळणी आणि इतर पायाभूत सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत.
विस्तारित विमानतळामुळे नाशिकची प्रमुख शहरांशी हवाई जोडणी अधिक सक्षम होण्यास मदत होईल. कुंभमेळ्यातील भाविक व पर्यटकांच्या वाहतुकीसह पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठीही हा विस्तार महत्त्वाचा ठरणार आहे.
नव्या एप्रनमुळे विमानतळावर अधिक विमाने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. एरोब्रिज, सुरक्षाव्यवस्था आणि सामान हाताळणी सुविधांच्या विस्तारामुळे वाढीव विमानसेवा अधिक सुरळीतपणे हाताळता येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाचा चेहरामोहरा बदलणार आहे. नव्या प्रवासी टर्मिनलची रचना धनुष्यबणाच्या आकाराची असणार असून, आधुनिक वास्तुरचेनसह प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
विस्ताराची ठळक वैशिष्ट्ये
♦ प्रकल्प खर्च : 629.41 कोटी रुपये.
♦ नवे प्रवासी टर्मिनल : 17,800 चौ.मी.
♦ नवे एप्रन : 1,15,220 चौ.मी.
♦ प्रवासी हाताळणी क्षमता : ताशी सुमारे 1,000.
♦ कुंभमेळा : वाढीव हवाई वाहतुकीसाठी सुविधा.
Passenger capacity of Nashik Airport to increase.
नाशिक : प्रतिनिधी दुष्काळी परिस्थितीचा सामना करणार्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना राज्य शासनाकडून आर्थिक दिलासा मिळाला…
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी शत्रू राष्ट्राकडून देशावर हवाई हल्ल्याचा संभाव्य धोका निर्माण झाल्यानंतर घ्यावयाची काळजी,…
निफाड : तालुका प्रतिनिधी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेशी संलग्न असलेल्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये…
अंबड गुन्हे शाखा युनिट तीनची यशस्वी कारवाई सिडको : प्रतिनिधी वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्या मुलींना…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या…
सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा शिंदे गटाला कोंडीत पकडणारा जोरदार युक्तिवाद नवी दिल्ली : प्रतिनिधी…