सिडको : प्रतिनिधी
नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथील पोलीस चौकी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. चौकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसल्याने परिसरात मद्यपी आणि टवाळखोरांचा वावर वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चौकीच्या परिसरात मद्याच्या बाटल्या आणि कचरा आढळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पवननगर हा रहिवासी तसेच वर्दळीचा परिसर आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येथे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या चौकीत अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने ती केवळ नावापुरतीच राहिल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. चौकीच्या परिसरात मद्याच्या बाटल्या पडलेल्या असून, कचर्यामुळेही अस्वच्छता निर्माण झाली आहे.
रात्रीच्या वेळी परिसरात पुरेशा पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने अंधाराचा फायदा घेत काही जण येथे मद्यपान करत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरातून ये-जा करणार्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
पवननगर येथे सायंकाळच्या वेळी भाजीबाजार भरतो. यावेळी महिला आणि इतर नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत पोलीस चौकीत कर्मचारी उपस्थित नसणे ही चिंतेची बाब असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. परिसरात नियमित पोलीस गस्त नसल्यास गैरप्रकारांना आळा कसा बसणार, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
♦ तीन ते चार महिन्यांपासून अधिकारी-कर्मचारी नसल्याचा आरोप
♦ चौकी परिसरात मद्याच्या बाटल्या आणि कचरा
चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी
पवननगर पोलीस चौकीत नियमित अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती करून ती पुन्हा कार्यान्वित करावी. तसेच मद्यपी आणि टवाळखोरांचा वावर रोखण्यासाठी सायंकाळी व रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील पथदिव्यांची व्यवस्थाही सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पवननगर परिसरातील पोलीस चौकी बंद आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने परिसरात अंधार असतो. या अंधाराचा फायदा घेत मद्यपान केले जात असल्याचे दिसते. चौकीत अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करून परिसरातील सुरक्षितता वाढवावी, अशी मागणी पवननगर येथील रहिवासी सुमित पगारे यांनी केली.
गेल्या अनेक महिन्यांपासून चौकीत अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने टवाळखोर तसेच मद्यपींचा वावर वाढला आहे. सायंकाळी येथे भाजीबाजार भरत असल्याने महिलांची मोठी वर्दळ असते. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चौकीत नियमित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी रहिवासी कपिल वाणी यांनी केली.
Pavannagar Police Outpost Deserted
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…
अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…
कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…