नाशिक

नाशिकमध्ये बेकायदा बाइक टॅक्सींचा सुळसुळाट

अ‍ॅग्रिगेटर धोरणाची मंजुरी नसल्याचा परिवहन विभागाचा दावा

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक शहरात रॅपिडो, ओला आणि उबर यांसारख्या अ‍ॅपआधारित प्रवासी सेवा सुरू असल्या, तरी शासनाच्या निर्धारित अ‍ॅग्रिगेटर धोरणानुसार आवश्यक अधिकृत मान्यता न घेता बाइक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणार्‍या बाइक टॅक्सींविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील तीन महिन्यांत सुमारे 60 ते 70 बाइक टॅक्सींवर कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
अ‍ॅपआधारित प्रवासी सेवा देणार्‍या कंपन्यांनी शासनाच्या निर्धारित अ‍ॅग्रिगेटर धोरणानुसार आवश्यक परवानग्या घेऊनच सेवा सुरू करणे अपेक्षित आहे. संबंधित कंपन्यांनी सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. आवश्यक अधिकृत मान्यता प्राप्त होईपर्यंत नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या अशा सेवांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे. बाइक टॅक्सी सेवेसाठी स्वतःचे वाहन वापरणार्‍या चालकांना कंपन्यांकडून कामाची संधी आणि आवश्यक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा असते. मात्र, संबंधित वाहनांवर कारवाई झाल्यानंतर चालक व वाहनमालकांना कंपन्यांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचे परिवहन विभागाने निदर्शनास आणून दिले आहे. परिणामी, कारवाईचा आर्थिक भार संबंधित वाहनमालकांवरच पडण्याची शक्यता आहे.
अशा वाहनांवर होणारा दंड सुमारे 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. काही प्रकरणांत ही रक्कम वाहनाच्या बाजारमूल्याइतकी किंवा त्यापेक्षाही अधिक ठरू शकते. त्यामुळे अल्प उत्पन्नाच्या अपेक्षेने बाइक टॅक्सी सेवेत सहभागी होणार्‍या वाहनमालकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
नागरिकांनी केवळ अ‍ॅपवर सेवा उपलब्ध आहे किंवा कंपनीकडून कामाची संधी दिली जात आहे, म्हणून संबंधित सेवा अधिकृत असल्याचे गृहीत धरू नये. वाहन प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यापूर्वी संबंधित कंपनीची शासकीय मान्यता आणि आवश्यक परवानग्यांची खातरजमा करावी. तसेच, स्वतःचे वाहन अशा कंपन्यांना जोडण्यापूर्वी कायदेशीर बाबी तपासाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.
संबंधित कंपन्यांनी शासनाच्या अ‍ॅग्रिगेटर धोरणानुसार आवश्यक मान्यता व परवानग्या प्राप्त करून नियमांचे पालन केल्यानंतरच प्रवासी सेवा चालवावी. तोपर्यंत नियमबाह्य प्रवासी वाहतूक केल्यास संबंधित वाहनचालक आणि वाहनमालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

वाहने अवैध प्रवासी सेवेसाठी देताना काळजी घ्या

शासनाच्या प्रवासी सेवा धोरणाबाबत अवैधरीत्या प्रवासी सेवा देणार्‍या विविध सेवा पुरवठादारांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनमालकांनी आपली वाहने अशा सेवा पुरवठादारांकडे कामासाठी देताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी सेवा दिल्यास मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अशा कारवाईचा आर्थिक फटका संबंधित वाहनमालकांनाही बसू शकतो. त्यामुळे वाहनमालकांनी शासनाच्या नियमांचे पालन करूनच आपली वाहने प्रवासी सेवेसाठी द्यावीत.
– सचिन बोधले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

Pavannagar Police Outpost Deserted

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

5 minutes ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

11 minutes ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

24 minutes ago

रखडलेला व्यापार करार

अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…

32 minutes ago

सप्तशृंगगडावर छबीना उत्सव साजरा

कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्‍याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…

42 minutes ago

गोदाघाटावर शंखनादाचा विश्वविक्रम

नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…

49 minutes ago