प्रतिमा

फोटो आणि बदलते ट्रेंड

यंत्रमानवाने-म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवाच्या आयुष्यात प्रवेश केल्यापासून आपल्या जगण्यातील अनेक गोष्टी झपाट्याने बदलताना दिसत आहेत. त्यातील एक आकर्षक आणि चर्चेचा विषय म्हणजे फोटो आणि त्यांचे बदलते ट्रेंड.

आजकाल सोशल मीडियावर नवनवीन फोटो ट्रेंड पाहायला मिळतात. नुकताच आलेला 1980 ट्रेंड पाहिला आणि त्यावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. आपल्या साध्या फोटोला एआयच्या मदतीने वेगळ्या वयाचे, वेगळ्या काळाचे किंवा वेगळ्या रूपाचे स्वरूप देऊन स्वतःला पाहण्याची ही एक वेगळीच गंमत आहे.
नवा ट्रेंड आला की, नकळत आपण स्वतःला त्यात पाहू लागतो, ’मी अशी दिसले तर कशी दिसेन?’, ’हा पोशाख माझ्यावर कसा दिसेल?’, ’ही पार्श्वभूमी आणि हा लूक मला शोभेल का?’ असे प्रश्न मनात येतात. काही काळापूर्वी एक फोटो ट्रेंड लोकप्रिय झाला आणि त्यानंतर जेमिनी व इतर कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे नवनवीन फोटो ट्रेंड आपल्यासमोर येऊ लागले. आता तर काही दिवसांनी एखादा नवा ट्रेंड आपले लक्ष वेधून घेतो.
खरं पाहता, यात काही गैर नाही. सुंदर दिसावे, स्वतःचे वेगळे रूप अनुभवावे आणि आपल्या आवडत्या कल्पनेत स्वतःला पाहावे, ही माणसाची स्वाभाविक इच्छा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने ही इच्छा काही क्षणांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. पारंपरिक वेशात, निसर्गाच्या सान्निध्यात, एखाद्या चित्राच्या रूपात किंवा एखाद्या वेगळ्या काळातील व्यक्तिमत्त्व म्हणून
स्वतःला पाहता येते. प्रत्यक्षात काहीही न करता आपल्या कल्पनेतील रूप समोर दिसणे, ही नक्कीच विलक्षण अनुभूती आहे. कधीकधी तर असे फोटो पाहून आपल्यालाही हसू येते.
या नव्या ट्रेंडमुळे कपड्यांच्या बाबतीतही एक मजेशीर बदल जाणवतो. पूर्वी एखादा ड्रेस किंवा साडी आपल्याला आवडली की, ती घेऊन फोटो काढण्याची इच्छा व्हायची. आता मात्र एआयच्या मदतीने आपल्याला आवडणारा पोशाख काही क्षणांत आपल्या फोटोवर पाहता येतो. ’अशी साडी घेतली तर मी कशी दिसेन?’ किंवा ’हा ड्रेस माझ्यावर कसा दिसेल?’ याचे उत्तर प्रत्यक्ष कपडे न घेता आणि फोटो न काढता लगेच मिळते. त्यामुळे कल्पना करून पाहण्याची ही सोय नक्कीच मजेशीर आणि आकर्षक आहे.
जुन्या आठवणींत रमून जाणे आणि त्या काळातील आपले रूप पुन्हा पाहणे, हीसुद्धा एक सुंदर अनुभूती आहे. कधी आपण स्वतःला तरुणपणी पाहतो, तर कधी भविष्यातील वयातील आपले रूप कल्पनेत अनुभवतो. त्या क्षणी मनात आठवणींची एक सुंदर सफर सुरू होते.
मात्र, या सगळ्या आकर्षणाच्या पलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, आपण खरोखर सुंदर कशामुळे दिसतो? बदललेल्या पाश्वर्र्भूमीमुळे? सुंदर कपड्यांमुळे? रंगरूपामुळे? की आपल्या चेहर्‍यावर उमटलेल्या भावांमुळे?
एआय आपला फोटो बदलू शकते, पण आपले विचार, स्वभाव आणि माणुसकी बदलू शकत नाही. बाह्यसौंदर्य काही काळ आकर्षित करते. मात्र, मनाचे सौंदर्य कायम लक्षात राहते.
एआयने बदललेला फोटो काही काळाचा आनंद देऊ शकतो, पण चेहर्‍यावरचे समाधानाचे हसू आयुष्यभराचे सौंदर्य असते.
रूप आणि रंग बदलणे हा काळाचा ट्रेंड असू शकतो, पण साधेपणा आणि प्रामाणिकपणा हा सदाबहार ट्रेंड आहे.
पाश्वर्र्भूमी बदलून फोटो सुंदर दिसेलही, पण माणसाचे आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपल्या विचारांची आणि वागण्याची पाश्वर्र्भूमी सुंदर असावी लागते.
म्हणूनच सुकरातांचे शब्द आजही मनाला स्पर्शून जातात,
ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, तिचा चेहरा आपोआपच देखणा दिसू लागतो. म्हणून बदलत्या ट्रेंडसोबत
स्वतःला नव्या रूपात पाहण्याचा आनंद नक्की घ्यावा, पण त्या सुंदर फोटोसोबत आपल्या खर्‍या चेहर्‍यावरील मनमोकळे हास्य आणि मनातील सौंदर्यही जपावे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या नव्या युगात फोटोचे ट्रेंड बदलत राहतील, चेहरे वेगवेगळ्या रूपांत दिसत राहतील, पण खरे सौंदर्य मात्र आपल्या विचारांत, वागण्यात आणि माणुसकीतच असते.

Photos and Changing Trends

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

21 minutes ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

24 minutes ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

32 minutes ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

35 minutes ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

58 minutes ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

1 hour ago