नवी दिल्ली :
दक्षिण अमेरिकन देश कोलंबियात हवाई दलाचं लॉकहीड सी 130 हर्म्युलस विमान कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या विमानातून 110 सैनिक प्रवास करत होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर येत आहे. विमानाने उड्डाण करताच काही क्षणात ते कोसळलं. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. विमानाने पेट घेतला आणि काही स्फोट झाले. यामुळे धुराचे लोट हवेत पसरले होते. आता अपघाताचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कोलंबियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना प्युर्टो लेगुइजामो प झाली. विमानाने उड्डाण करताच काही वेळातच हो दुर्घटना घडली. विमानात मोठ्या संख्येनं लष्कराचे जवान होते. 110 सैनिक या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी भीषण आग लागली. या आगीमुळे बचावकार्य करणं कठीण बलं. घटनास्थळी लष्कराचे पथक आणि बचावपथके दाखल झाली आहेत. जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू असून, त्यांना रुग्णालयात नेलं जात आहे. आग आटोक्यात आणण्यात येत आहे. अपघात कशामुळे झाला याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
विमानाने उड्डाणानंतर काही मिनिटातच पेट घेतला आणि ते खाली कोसळलं. घटनास्थळ शहरी वस्तीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर आहे. अद्याप सरकारने किंवा अधिकार्यांनी मृतांचा आकडा सांगितलेला नाही. पण अपघात भीषण असून, यात मृतांचा आकडा जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.
Plane carrying 110 soldiers crashes in Colombia
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…