नाशिक

मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ?

अंधशाळेतील निदेशकाची नियुक्ती वादात

नाशिक : प्रतिनिधी
मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित गंभीर प्रकार समोर आला आहे. अंध विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार्‍या निदेशकाचे मतिमंद मुलांच्या शाळेत समायोजन करण्यात आल्याने समाजकल्याण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या या प्रकरणामुळे शैक्षणिक पात्रता व निर्णय प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली आहे.
संबंधित प्रकरणाची सखोल पडताळणी न करता समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी समायोजनेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला. अंध व मतिमंद शिक्षणातील मूलभूत फरक लक्षात न घेता घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल, मोबिलिटी प्रशिक्षण व सहाय्यक तंत्रज्ञान आवश्यक असते, तर मतिमंद विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण योजना, वर्तन व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवन कौशल्यांवर भर दिला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे समायोजन विद्यार्थ्यांच्या गरजांशी विसंगत ठरू शकते.
राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने 7 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार ज्योती महाजन यांचे नाव समाज सेवार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
या प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेची पडताळणी न करणे, मान्यता रद्द संस्थेतील निदेशकाचे समायोजन करणे यामुळे अनियमिततेचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात हितसंबंध आणि आर्थिक देवाणघेवाणीची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.
समायोजन आदेश तत्काळ स्थगित करावा, समाज सेवार्थ प्रणालीतील समावेश थांबवावा, संबंधितांचे वेतन व भत्ते रोखावेत आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अंध व मतिमंद शिक्षणातील फरक लक्षात न घेता घेतलेले निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

माहिती अधिकारातून उघड झालेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. विशेष शिक्षणातील नियम व पात्रता तपासल्याशिवाय केलेले समायोजन मतिमंद विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
– विठोबा द्यानद्यान

Playing with the education of mentally retarded students?

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

18 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

18 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

18 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

19 hours ago