नाशिक

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 89 हजारांची रोकड जप्त

23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : प्रतिनिधी
अंबड परिसरातील एका हॉटेलमधील बंद खोलीत सुरू असलेल्या तीनपत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 89 हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई पहाटेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक झनकसिंग नरसिंग घुणावत यांच्या पथकाने कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड येथील एका हॉटेलच्या बंद खोलीत काही जण तीनपत्ती नावाचा जुगार पैशांची पैज लावून खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी दीपक खंडू साळुंखे (वय 40, रा. पवननगर, सिडको) याच्यासह 23 जण जुगार खेळताना व खेळविताना आढळून आले.
पोलिसांनी गणेश सुरेश वाघ (35, रा. राजरत्ननगर, सिडको), जावेद रज्जाक शेख (40, रा. भद्रकाली), राहुल सूर्यभान गायकवाड (48, रा. चुंचाळे), मिलिंद निवृत्ती भरीत (38, रा. चुंचाळे), शांताराम विष्णू भरीत (34, रा. सिडको), अशोक सुकदेव पोकळे (46, रा. कोठुरे, ता. निफाड), लहानू बाळू बागडे (67, रा. मानवेडे, ता. इगतपुरी), विराज मधुकर मोरे (30, रा. विल्होळी), पंकज तुळशीराम जाधव (45, रा. ध्रुवनगर, सातपूर), सचिन प्रकाश सोनवणे (36, रा. इंदिरानगर), बाळासाहेब महादू सोनवणे (38, रा. पाथर्डी फाटा), रामदास वसंत रनमाळे (45, रा. वाडीवर्‍हे, ता. इगतपुरी), विजय उत्तमराव कदम (35, रा. सिडको), जगदीश आनंदा निकुंभ (51, रा. अंबड), रवींद्र मारू ठाकरे (43, रा. पंचवटी), अजीज अब्दुल वहाब (63, रा. चेतनानगर), पंकज रामचंद्र शिंपी (34, रा. सिडको), समाधान सुरेश आरोटे (24, रा. सिडको), सुनील रामुरन प्रजापती (27, रा. सिडको), संदीप रवींद्र राजपूत (43, रा. राणेनगर), राजू विश्वास गतीर (45, रा. मुंढेगाव, ता. इगतपुरी), विकी मनोहर चौधरी (34, रा. सिडको) आणि शरद वाळू काळे (45, रा. सिडको) यांच्याविरुद्ध कारवाई केली. संशयित आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच इतरांच्या मदतीने पैशांची पैज लावून तीनपत्ती जुगार खेळत व खेळवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Police raid gambling den; ₹89,000 in cash seized.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

16 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

16 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

17 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

17 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

17 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

17 hours ago