नाशिक

खड्ड्यांचा वाहनांना दणका, स्पेअर पार्टचा खर्च वाढला

सस्पेन्शन, शॉक अ‍ॅब्झॉबर्र्र,चाकांचे नुकसान; टायरची झीज

नाशिक : प्रतिनिधी
रस्त्यांवरील खड्डे केवळ अपघात आणि वाहतूक कोंडीचे कारण ठरत नसून, वाहनधारकांच्या खिशालाही मोठा फटका बसत आहे. खड्ड्यांतून वाहन आदळल्याने सस्पेन्शन, शॉक अ‍ॅब्झॉबर्र्र, टायर, चाक तसेच स्टिअरिंग यंत्रणेचे नुकसान होत आहे. परिणामी वाहनधारकांना वारंवार गॅरेजमध्ये जावे लागते. स्पेअर पार्ट बदलण्याचा आणि दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. पावसाळ्यात या समस्येत आणखी भर पडल्याचे वाहनदुरुस्ती व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
शहरातील विविध प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी सिंहस्थाच्या कामांसाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. वेगाने येणारे वाहन अचानक खड्ड्यात आदळल्यास टायर, चाक आणि वाहनाच्या पुढील भागावर मोठा ताण येतो. दुचाकीस्वारांसाठी तर ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. वाहनाचा तोल जाऊन अनेक वेळा अपघात होत असल्याचे चित्र आहे.
चारचाकी वाहनांत खड्ड्यांचा सर्वाधिक परिणाम सस्पेन्शन आणि शॉक अ‍ॅब्झॉर्बरवर होतो. वारंवार खड्ड्यांतून वाहन गेल्यास या भागांची झीज वेगाने होते. चाकांचे संतुलन बिघडणे, टायरची असमान झीज, स्टिअरिंगमध्ये कंपन जाणवणे अशा तक्रारीही वाहनधारकांकडून केल्या जात आहेत. काही प्रकरणांत एकाच वेळी अनेक भाग बदलावे लागत असल्याने दुरुस्तीचा खर्च आणखी वाढतो. महापालिकेकडून विविध ठिकाणी खड्डे बुजविण्याची कामे केली जात असली, तरी पावसामुळे काही ठिकाणी पुन्हा रस्त्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजविण्याऐवजी रस्त्यांची टिकाऊ दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

खड्ड्यांमुळे महिन्याच्या खर्चात भर
खड्ड्यांमुळे वाहन चालवताना सतत काळजी घ्यावी लागते. खड्डा चुकविताना वाहनाचा वेग कमी करावा लागतो. अचानक खड्डा आल्यास वाहनाचे नुकसान होते. टायर, सस्पेन्शन किंवा अन्य भागांची दुरुस्ती वारंवार करावी लागत असल्याने नियमित वाहन खर्चाव्यतिरिक्त आर्थिक भार वाढत आहे.
– दिलीप पाटील, नागरिक

खड्ड्यांमुळे दुरुस्तीचा वाढता खर्च
वाहनाचा भाग                                    अंदाजे खर्च
दुचाकी पुढील शॉक अ‍ॅव्झॉर्बर              1,000 ते 3,000
दुचाकी टायर                                      1,200 ते 3,500
दुचाकी रिम                                        1,000 ते 3,000
चारचाकी शॉक अ‍ॅब्झॉर्बर                    2,500 ते 8,000
चारचाकी सस्पेन्शन                          2,000 ते 10,000
चारचाकी टायर                                  4,000 ते 12,000
व्हील अलाइनमेंट                              1000 ते 1500
वाहनांच्या मॉडेलनुसार दर कमी-अधिक असण्याची शक्यता असते, असे गॅरेज चालकांनी सांगितले.

 

Potholes jolt vehicles; spare parts costs rise.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

21 hours ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

22 hours ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

22 hours ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

22 hours ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

22 hours ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

22 hours ago