नाशिक

जुन्या नाशकातील वीजतारा भूमिगत होणार

आ. देवयानी फरांदेंच्या पाठपुराव्याला यश

नाशिक : प्रतिनिधी
जुन्या नाशकातील अरुंद गल्ल्या, दाट लोकवस्ती आणि घरांच्या अगदी जवळून जाणार्‍या धोकादायक वीजतारांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यानंतर जुन्या नाशकासह शहरातील मध्यवर्ती भागातील वीजतारा भूमिगत करण्याच्या कामाला महावितरणने मंजुरी दिली असून, या कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच उत्सवी मिरवणुकांच्या मार्गावरील धोका कमी होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे काम मार्गी लागणार असल्याने कुंभमेळ्यात धोका कमी होण्यास मदत होईल.

जुने नाशिक हा शहराचा ऐतिहासिक गावठाण परिसर असून, येथे दाट लोकवस्ती आणि अरुंद गल्लीबोळ आहेत. या भागात अनेक ठिकाणी वीजवाहक तारा थेट घरांच्या खिडक्या, बाल्कनी आणि भिंतींलगतून जातात. काही ठिकाणी या तारा इतक्या खाली लोंबकळत आहेत की, नागरिकांना घराबाहेर पडताना, गल्ल्यांमधून ये-जा करताना तसेच घराच्या गच्चीवर वावरताना विशेष काळजी घ्यावी लागते. लागून असलेली घरे, अरुंद रस्ते आणि गल्लीबोळांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी जुन्या नाशकातील वीजतारांच्या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला. या परिसरातील प्रत्यक्ष अडचणी आणि नागरिकांच्या जीविताला असलेला धोका महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

जुन्या नाशकातील धोकादायक वीजतारांचा प्रश्न हा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. अरुंद गल्ल्या, दाट लोकवस्ती आणि घरांच्या खिडक्या, बाल्कनी तसेच गच्च्यांजवळून लोंबकळत्या तारांमुळे नागरिकांसह लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. मिरवणुकीदरम्यान या तारांमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेता, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. -आमदार प्रा. देवयानी फरांदे

वीजतारा भूमिगत करण्यासाठी प्रस्तावित मार्ग

चौकमंडई ते फाळके रोड, वाकडी बारव ते चौकमंडई, वाकडी बारव ते बुरूड गल्ली, शालिमार ते भद्रकाली, रंगारवाडा ते तिरकपुरी मशीद बडी दर्गा ते आदमशाह, बिरबल आखाडा ते चौकमंडई, बुरूड गल्ली ते कोकणी चौक, नानावली ते रेडक्रॉस, नानावली फूलबाजार ते दामोदर मोदकेश्वर मंदिर ते साक्षी गणपती, तेली गल्ली ते गायधनी गल्ली, कोकणीपुरा ते बडी दर्गा, महावितरण कार्यालय ते इक्बाल हॉटेल मल्हारवाडा ते आर. सी. मॉल ते सराफ बाजार, गायधनी गल्ली, गोरेराम कॉम्प्लेक्स ते खरे सदन, तेली गल्ली, रविवार कारंजा, आंबेडकर पुतळा ते मोठा राजवाडा अमरधाम ते गुमशाम दर्गा, कानडे मारुती ते जय मल्हार, दिल्ली दरवाजा ते बालाजी कोट, अमरधाम ते मोदकेश्वर, अमरधाम ते काझी गढी, तेली गल्ली ते गोरेराम कॉम्प्लेक्स, दिल्ली दरवाजा ते कानडे मारुती, मल्हार गेट पोलीस चौकी ते हेमलता थिएटर, मारुती संकुल ते सरकारवाडा, महावितरण एबी स्विच ते मुळाणे डीटीसी, कॅनडा कॉर्नर सिग्नल ते एचडीएफसी सिग्नल, सम्राट स्पोर्ट्स ते नाशिक जिमखाना, राजीव गांधी भवन ते कुलकर्णी फीडर, मार्गारेट टॉवर ते सरला अपार्टमेंट, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय ते महात्मा फुले वसाहत, महेशनगर ते कुटे मार्ग, आयएमए हॉल ते आंबेडकर पुतळा, भद्रकाली ते दूधबाजार सबस्टेशन.

Power lines in Old Nashik to go underground.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago