नाशिक

राज्यातील 1058 आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पटपडताळणी

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील एक हजार आश्रमशाळांमधील विद्यार्थी पटसंख्येची पडताळणी करण्यासाठी एकाच दिवशी विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शासकीय 500 तर अनुदानित 558 आश्रमशाळांचा समावेश होता. आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत पटपडताळणी मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.
आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी 30 सप्टेंबर 2026 रोजी अखेरच्या पटसंख्येच्या अनुषंगाने विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांना भेटी देण्यासाठी तपासणी अधिकार्‍यांची नियुक्ती केली होती. शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये नियुक्त तपासणी अधिकार्‍यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे वर्गनिहाय व तुकडीनिहाय मोजणी केली. तसेच संबंधित विद्यार्थ्याची नोंद शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये असल्याची खात्री करण्यात आली.
मोजणीच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याला उभे करून त्याचे पूर्ण नाव विचारण्यात आले. त्यानंतर वर्गहजेरीसमोर विद्यार्थ्याची उपस्थिती नोंदवून, नोंदवहीतील माहिती आणि प्रत्यक्ष उपस्थिती यांची पडताळणी करण्यात आली. तसेच, तपासणीच्या वेळी शाळेतील शिक्षक व संबंधित कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत आवश्यक नोंदी पूर्ण करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर मार्करने निशाणी
पटपडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर निळ्या शाईच्या मार्करने निशाणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांची दुबार मोजणी होणार नाही, याचीही विशेष दक्षता घेण्यात आली.

आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांची अचूक पटसंख्या व प्रत्यक्ष उपस्थिती निश्चित करणे महत्त्वाचे आहे. विशेष पटपडताळणी मोहिमेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थी नोंदींची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास आणि शैक्षणिक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यास मदत होईल.
-लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

Simultaneous student enrollment verification in 1,058 ashram schools across the state on a single day.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago