संपादकीय

प्रेग्नन्सी ग्लो

पाळी चुकली हे जेव्हा तिला कळतं त्या दिवसापासून नऊ महिन्यांपर्यंत प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण तिच्यासाठी नाजूक, अनमोल, आणि हळवा असतो. लाज आणि आनंदमिश्रित चेहर्‍यावर वेगळाच ग्लो येतो त्याला प्रेग्नेंसी ग्लो म्हणतात. शरीरात होणारे बदल, वाढणार्‍या पोटाचा आकार आरशात बघताना ती स्वतःवरच खुश असते. निसर्गाने स्त्रीला दिलेलं मातृत्वाचं वरदान अनमोल आहे.
सुरू होतात गर्भसंस्कार येणार्‍या बाळाच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक भावनिक, वाढीसाठी. जगात जे जे सुंदर, निर्मळ, स्वच्छ आहे ते त्यानी ऐकावं आणि खरोखर या सगळ्या गोष्टी खूप खूप परिणामकारक असतात. तीन महिन्यापर्यंत कुणाला काही सांगायचं नाही ही वडीलधार्‍यांनी घातलेली अट. आणि मग एकदा चोर ओटी भरून ही आनंदाची बातमी सर्वांना कळते. सुरू असतो तिचा प्रवास बाईपणापासून ते आईपणापर्यंत. तिच्या आवडीनिवडी, तिचे मूड स्विंग, तिचे हट्ट कुटुंबात पुरवले जातात. आपले इतके लाड पुरवले जातात ही जाणीव तिला सुखावून जाते आणि हीच अंतरिक प्रसन्नता म्हणजे प्रेग्नेंसी ग्लो.
सोनोग्राफीत बाळाच्या हालचाली बघण्याची उत्सुकता आणि मग त्याच विषयावर नवरा-बायकोच्या तासनतास गप्पा. तो किंवा ती येण्याची चाहूल लागलेली असताना फक्त आणि फक्त त्याच भावविश्वात रमलेले न्यूअली बॉर्न आई-बाबा. बाळाच्या हालचाली आणि त्याने मारलेली इवली किक आणि परत परत त्याच्या नाजूक पावलाच्या स्पर्शाने हरखून जाणारी आई आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना उजळणारा तिचा चेहरा म्हणजे प्रेग्नेंसी ग्लो.
डोहाळजेवण, आई होणार्‍या बाईच्या जीवनातील अतिशय आनंदाचा सोहळा. पानाफुलांनी सजवलेला पाळणा, हिरवी साडी, फुलांच्या माळा, कंबरपट्टा, फुलांचे दागिने, हातात धनुष्यबाण घेऊन, चंद्राच्या कोरीत बसून काढलेले फोटोज्. ती इतकी खुलून दिसते की चंद्र, तारकाही फिक्या पडतात.
त्यावेळी तिचा खुलणारा चेहरा म्हणजे प्रेग्नेंसी ग्लो..
मुलगा की मुलगी हे ओळखण्यासाठी झाकून ठेवलेल्या वरण्या, गोड पदार्थ, ती नक्की काय उघडते याची लागलेली उत्सुकता. खरं म्हणजे आपली संस्कृती आपली परंपरा, रीतिरिवाज इतके गोड सुंदर आहेत ना! की या छोट्या-छोट्या गोष्टी गर्भवती स्त्रीचा आनंद द्विगुणित करतात.
अशाच आनंदाच्या सोहळ्यात सहभागी करण्यासाठी हल्ली ट्रेंड म्हणून फॅशन म्हणून पब्लिसिटी म्हणून जे उघडेनागडे फोटो, बेबी बम्प दाखवताना होणारी आई वेगवेगळ्या पोजेस देऊन, असं कसं प्रदर्शन करू शकते? बेबी बम्प फोटोशूट करताना इतर अवयवांच्या वस्त्रांची काटकसर कशासाठी? अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी असेच फोटोशूट करतात.
माहीत नाही कसला प्रेग्नेंसी ग्लो दिसतोय, बघितल्यावर शुद्ध वेडेपणा किंवा विकृती वाटते. कौतुक असावं पण असं? स्त्री सर्वांत सुंदर केव्हा दिसते माहीत आहे? जेव्हा ती आई होणार असते. बाकी मेकअप, दागदागिने, ड्रेसअप या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. खरंय ना!

Pregnancy Glow

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago